मुंबई, 15 डिसेंबर : स्वप्नांचे जग रहस्यांनी भरलेलं आहे. अनेकवेळा आपण अशी स्वप्ने पाहतो जी सत्यासारखी वाटतात आणि झोप मोडल्यानंतर आपल्याला काहीतरी विचार करायला भाग पाडतात. कधीकधी आपण अशी स्वप्ने देखील पाहतो, ज्यामुळे आपल्याला असे वाटते की, जीवनात काहीतरी चांगले घडेल किंवा चांगली बातमी मिळणार आहे. काही रहस्यमय स्वप्ने आपले जीवन बदलू शकतात. स्वप्नांच्या विज्ञानानुसार, अनेक स्वप्ने भविष्यातील घटनांचा इशारा देतात. तुम्हाला अशी काही स्वप्ने पडत असतील ज्यामध्ये पैसा मिळण्याचे संकेत (Being Rich In Future) असतील तर कदाचित तुमच्या आयुष्यात धनसंपत्ती येण्याची ती पूर्वसूचना असू शकते. ज्योतिषशास्त्र असेही मानते की, काही स्वप्ने अचानक आर्थिक लाभ मिळण्याची पूर्वसूचना असतात. जाणून घेऊया रात्री दिसणारी स्वप्ने धनप्राप्तीकडे कशी (Dreams Signs Of Being Rich In Future) घेऊन जातात.
धनप्राप्तीकडे नेणारी स्वप्ने
1. सापाचे बीळ
स्वप्नात जर तुम्हाला सापाचे बीळ (snake in dream) किंवा बिळातून बाहेर येताना साप दिसला तर ते जीवनात काहीतरी चांगले आणि शुभ होण्याचे लक्षण मानले जाते. हा इशारा असतो की, भविष्यात तुम्हाला अचानक पैसे मिळणार आहेत.
2. झाडांवर चढणे
जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला झाडावर चढताना (climbing on tree in dream) पाहिले असेल, तर तुम्हाला कुठूनतरी अचानक पैसे मिळण्याचा इशारा आहे. अचानक पैसे मिळाल्याने तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
3. नृत्य करणारी स्त्री
स्वप्नात एखादी स्त्री नाचताना दिसली तर ते खूप शुभ मानले जाते. हे भविष्यात अचानक पैसे मिळण्याचे संकेत देते.
4. सोने पाहणे
स्वप्नात सोने दिसल्यास ते घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच पैसे आणि सोने मिळू शकते.
हे वाचा - कोल्हापुरातून चोरीला गेली अन् सांगोल्यात सापडली, मूळ मालकाला पाहताच म्हशीने फोडला हंबरडा
5. मधमाशांचे पोळे
स्वप्नात मधमाशांचे (Honey Bee Nest In Dream) पोळे पाहणे देखील शुभ मानले जाते. मधमाशांचे पोळे हे संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे आणि तुम्हाला कदाचित अचानक पैसे मिळू शकतात.
6. उंदीर
स्वप्नातील उंदीर ही श्रीगणेशाची स्वारी आहे, विघ्नकारी आहे. स्वप्नात उंदीर दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते. उंदीर दिसणे हे घरात पैसे येण्याचे संकेत आहे. त्यामुळे घरातील उंदीर कधीही मारू नयेत, असेही सांगितले जाते.
७.देवतेचे दर्शन
स्वप्नातील देवीचे दर्शन होणे हे माता लक्ष्मी घरामध्ये येणार असल्याचे लक्षण आहे आणि तुम्हाला संपत्तीसह यश प्राप्त होणार आहे.
8. दिवा लावणे
हे वाचा - Healthy Drink : मेथी-ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे, जाणून घ्या बनवण्याची पद्धत
जर तुम्हाला स्वप्नात जळणारा दिवा दिसला तर ते धन आणि यशाचे लक्षण देखील असू शकते.
9. अंगठी
स्वप्नात अंगठी घातलेली दिसली तर भविष्यात शुभ लाभ होतो. तुम्ही स्वप्नात स्वत:ला पांढरी किंवा लाल मोत्याची अंगठी घातलेली दिसली तर ते तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता असते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.