जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सावधान! दैनंदिन वापरातील 'या' वस्तू ठरू शकतात आरोग्यासाठी घातक

सावधान! दैनंदिन वापरातील 'या' वस्तू ठरू शकतात आरोग्यासाठी घातक

लाईफस्टाईल

लाईफस्टाईल

आपण दररोज आपल्या शरीराची आणि घरातील विविध वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी अनेक क्लिनर्सचा वापर करतो.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आपण दररोज आपल्या शरीराची आणि घरातील विविध वस्तूंची स्वच्छता करण्यासाठी अनेक क्लिनर्सचा वापर करतो. अगदी दात घासण्याची पेस्ट, आंघोळीचा साबण किंवा बॉडीवॉश हे सुद्धा एक प्रकारचे क्लिनर्सच आहेत. त्यांच्या मदतीने आपण व्हायरस आणि बॅक्टेरियांचा नाश करतो. मात्र, हेच क्लिनर्स आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? घरातील साफ-सफाईच्या वस्तूंबाबत एक धक्कादायक रिचर्स समोर आला आहे. साबण, टूथपेस्ट आणि साफ-सफाईसाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांमध्ये प्रतिजैविक प्रतिकाराशी अर्थात अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सशी संबंधित एक केमिकल आढळलं आहे. हे केमिकल मानवी शरीरातील बॅक्टेरियासारखे घटक नष्ट करणाऱ्या अँटीबॉडीजना हानी पोहोचवतं. टीव्ही 9 भारत वर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बॅक्टेरिया आणि बुरशी त्यांना मारण्यासाठी तयार केलेल्या औषधांवर मात करण्याची क्षमता विकसित करतात तेव्हा अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्सशी समस्या निर्माण होते. म्हणजेच आपल्या शरीरातील बॅक्टेरिया कमी करणारी यंत्रणा काम करत नाही. त्यामुळे बॅक्टेरियांची संख्या वाढत राहते. रेझिस्टन्स इंफेक्शनवर उपचार करणं कठीण आहे. कधीकधी तर उपचार करणंही अशक्य होतं. हेही वाचा -  सतत मेकअप करणं पडू शकतं महागात; ब्युटी प्रॉडक्ट्सच्या अतिवापराचे ‘हे’ आहेत गंभीर परिणाम कॅनडातील टोरांटो युनिव्हर्सिटीतील असिस्टंट प्रोफेसर हुई पेंग यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधकांच्या गटानं याबाबत रिसर्च केला आहे. त्यांनी केलेल्या रिसर्चनुसार, मातीमध्ये हजारो रसायनं मिसळलेली आहेत. यामध्ये ट्रायक्लोसन हे मुख्य अँटिबॅक्टेरिअल कंपाउंडही आढळलं आहे. हे कंपाउंड मानवी शरीरातील E-coli या घटकावर परिणाम करतं. अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स ठरत आहे धोकादायक सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (सीडीसी) म्हणजेच रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या म्हणण्यानुसार, अँटिमायक्रोबायल रेझिस्टन्स ही समस्या जगभरातील सर्वसामान्यांसाठी एक मोठा धोका ठरत आहे. यामुळे जगभरात आत्तापर्यंत 1.27 दशलक्ष लोकांचा बळी गेला आहे. 2019 मध्ये सुमारे 50 लाख नागरिकांच्या मृत्यूसाठी हीच समस्या कारणीभूत ठरली आहे. दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणार्‍या उत्पादनांमध्ये हानिकारक रसायनं सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडच्या काळात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सुमारे महिनाभरापूर्वी आपल्या बेबी पावडर उत्पादनामुळे ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीला हजारो खटल्यांचा सामना करावा लागला होता. कंपनीनं उत्पादन घेतलेल्या केलेल्या बेबी पावडरमुळे कॅन्सर होऊ शकतो, असा आरोप जगभरात दाखल झालेल्या विविध खटल्यांमध्ये करण्यात आला होता. यूएस एफडीएला अनेक उत्पादनांमध्ये कॅन्सरकारक अॅस्बेस्टॉस आढळलं आहे. त्यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरचाही समावेश आहे. बेंझिन, अॅस्बेस्टॉस, ट्रायक्लोसन असलेली उत्पादनं कॅन्सरला कारणीभूत नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्सल्टंट डरमॅटॉलॉजिस्ट डॉ. ओशिन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध प्रकारचे ड्राय शॅम्पू, एरोसोलाइज्ड स्प्रे, परफ्युम आणि सनस्क्रीनमध्ये बेंझिन नावाचं संयुग असतं. हे बेंझिन दीर्घकाळ वापरल्यास विविध प्रकारचे ब्लड कॅन्सर आणि ल्युकेमिया होऊ शकतो. ते म्हणाले, “दररोज ड्राय शॅम्पू वापरणारे रुग्ण मी बघितले आहेत. दररोज शॅम्पू वापरल्यानं डोक्याच्या त्वचेची रोमछिद्र बंद होऊ शकतात. त्यामुळं डोक्यात खाज येऊन केस गळती सुरू होते.” हेही वाचा -  Winter Health: हिवाळ्यात केसांची अशी राखा निगा, कोंडा घालवण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा आपण दररोज वापरतो त्या टाल्कम पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस हे खनिज असतं. याबाबत बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाले, “बेबी पावडर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आय शॅडोमध्ये अॅस्बेस्टॉस असतं. सामान्यतः त्यांचा वास घेतल्यानं किंवा शरीराच्या प्रायव्हेट अवयवांवर सतत लावल्यानं गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांसाठी किंवा प्रौढ व्यक्तींनीही पावडरचा वापर टाळला पाहिजे. विशेषत: लहान मुलांसाठी पावडर न वापरता डायपर रॅश क्रीम वापरणं योग्य ठरेल.” टूथपेस्टबद्दल बोलताना डॉ. अग्रवाल म्हणाले की, त्यात ट्रायक्लोसन कंपाउंड असतं. जर त्याचा दीर्घकाळ वापर झाला तर कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतं. युनिलिव्हरनं अनेक उत्पादनं मार्केटमधून मागे घेतली अलीकडेच, युनिलिव्हर या मोठ्या कंपनीनं अमेरिकेतील बाजारपेठेतून ऑक्टोबर 2021पूर्वी तयार केलेली उत्पादनं परत मागवली आहेत. यामध्ये, ड्व्ह, नेक्सस, टिगी (रॉकहोलिक और बेड हेड) या ड्राय शॅम्पूंचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, या ड्राय शॅम्पूंमध्ये बेंझिन नावाचं केमिकल आढळलं आहे. ज्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे युनिलिव्हरनं ही उत्पादनं परत मागवली आहेत. याशिवाय, सरकारी एजन्सीनंही किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या दुकानातून हे ड्राय शॅम्पू काढून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. डॉ. ओशिन अग्रवाल यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, आरोग्यास घातक ठरणारी उत्पादनं बाजारात उपलब्ध आहेत. कारण, त्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आरोग्याशी संबंधित बाबींकडे दुर्लक्ष करून त्यांचं व्यावसायिकीकरण करत आहेत. उत्पादनं तयार करताना कंपाउंडचा बारकाईनं अभ्यास करणारा कोणताही स्टँडर्ट सेटअप या कंपन्यांकडे नाही. जोपर्यंत या कंपन्या स्टँडर्ड सेट करत नाहीत आणि कंपाउंड प्रोपोरेशन करत नाहीत तोपर्यंत या उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉ. अग्रवाल यांनी दिला आहे. ते म्हणाले, “जोपर्यंत कंपन्यांना योग्य आणि सुरक्षित वैज्ञानिक पर्याय मिळत नाही. तोपर्यंत बेंझिन, अॅस्बेस्टॉस, ट्रायक्लोसन असे घटक असलेली सर्व उत्पादनं टाळण्याचा आणि सेंद्रिय व नैसर्गिक उत्पादनांचा अधिक वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात