दही वापरा : केसांची योग्य निगा राखण्यासाठी दह्याचा वापर फायदेशीर ठरेल. दही हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं. दह़्याचा हेअर मास्क लावून कोंडा सहज घालवू शकता. यासाठी केसांना शॅम्पू केल्यानंतर दही लावा आणि 10-15 मिनिटांनी केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांना चमक येईल. (इमेज/कॅनव्हा)
टी ट्री ऑइल लावा: हिवाळ्यात केसांमधील कोंडा घालवण्यासाठी टी ट्री ऑइलचाही उपयोग केला जाऊ शकतो. यासाठी टी ट्री ऑइलमध्ये खोबरेल तेल मिसळून केसांना लावा आणि तासाभराने केसांना शॅम्पू करा. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल घटक केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तसेच टाळूच्या त्वचेला संसर्गमुक्त ठेवण्यास मदत करतात.(इमेज/कॅनव्हा)
कोरफड जेल: औषधी घटकांनी समृद्ध, कोरफड जेल केसांमधील कोंडा कमी करण्यास आणि ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. एलोवेरा जेल थेट केसांच्या मुळांवर लावा आणि 10-15 मिनिटांनी केस धुवा. यामुळे हिवाळ्यातही तुमचे केस कोंडा मुक्त आणि मऊ राहतील.(इमेज/कॅनव्हा)
मेथीचा हेअर मास्क वापरा : हिवाळ्यात कोंड्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मेथीचा वापर हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी गरम पाण्यात मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि त्यात लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. एका तासानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.(इमेज/कॅनव्हा)
खोबरेल तेल : हिवाळ्यात डोक्याच्या त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचीही मदत घेऊ शकता. यासाठी खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून डोक्याची चांगली मालिश करा. त्यानंतर केसांना टॉवेल गुंडाळा आणि अर्ध्या तासानंतर केस शॅम्पूने धुवा. यामुळे केसांचा कोंडा सहज कमी होईल. (इमेज/कॅनव्हा)