जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सतत मेकअप करणं पडू शकतं महागात; ब्युटी प्रॉडक्ट्सच्या अतिवापराचे 'हे' आहेत गंभीर परिणाम

सतत मेकअप करणं पडू शकतं महागात; ब्युटी प्रॉडक्ट्सच्या अतिवापराचे 'हे' आहेत गंभीर परिणाम

ब्युटी प्रोडक्ट्स

ब्युटी प्रोडक्ट्स

मार्केटमधील सौंदर्य प्रसाधनं ही काही अंशी तुमचं सौंदर्य वाढवतात, पण त्याहीपेक्षा त्याचे दुष्परिणामही खूप आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 नोव्हेंबर :   सध्याच्या जगात दिसण्यावर अधिक भर दिला जातो. अनेकजण सुंदर, आकर्षक दिसण्यासाठी प्रसंगी सर्जरीही करतात. अर्थात, महिलावर्ग याबाबतीत विशेष जागरूक असतो. यामुळे मार्केटमधील ब्युटी प्रॉडक्ट्स कंपन्यांसाठी टारगेट कन्झ्युमर महिलाच असतात. त्वचा चांगली राहावी यासाठी मार्केटमध्ये अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स उपलब्ध असतात. परंतु, अनेकदा ही ब्युटी प्रॉडक्ट्स ही सगळ्यांना मानवत नाहीत. प्रत्येकाच्या आरोग्यानुसार किंवा त्वचेच्या प्रकारानुसार ती वापरणं श्रेयस्कर ठरतं. यासाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं हिताचं. परंतु, अनेकांना कुठलं प्रॉडक्ट वापरावं याची पुरेशी माहिती नसतं. आपण जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती. सुंदर दिसणं हे काही कुणाच्या हातात नसतं. परंतु, अनेकदा हे सत्य स्वीकारणं अवघड जातं. मार्केटमधील सौंदर्य प्रसाधनं ही काही अंशी तुमचं सौंदर्य वाढवतात, पण त्याहीपेक्षा त्याचे दुष्परिणामही खूप आहेत. देशातील ब्युटी प्रॉडक्ट्सचा व्यवसाय तेजीत सोशल मीडियावरही विविध कंपन्या ब्युटी प्रॉडक्ट्सचं मार्केटिंग करताना दिसतात. अनेकजण रेटिनॉल आणि नियासिनामाइडसारखी प्रॉडक्ट्स खूप वापरताना दिसतात. त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे देशभरात सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. दरम्यान, भारतात दररोज ब्युटी प्रॉडक्ट्सच्या वापरामध्ये 5.6% वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पण, त्वचेचा उजळपणा वाढवण्यासाठी वापरली जाणारी ही प्रॉडक्ट्स घातक ठरत आहेत. हेही वाचा -  Winter Health Tips : हिवाळ्यात त्वचेची चमक आणि आरोग्य दोन्हीही राहील कायम; फक्त या तेलाने करा मसाज योग्य वयातच ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करणं हितावह ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये रेटिनॉलचं प्रमाण खूप असतं. खरं तर, त्वचेसाठी हे उपकारकच आहे. परंतु, 20 वर्ष किंवा त्याखालील मुलींच्या त्वचेसाठी रेटिनॉलचा वापर हानीकारक ठरतो. रेटिनॉलच्या वापरामुळे त्यांच्या चेहर्‍यावर पुरळ, डागांचं, फोडांचं प्रमाण वाढतं. भरपूर पाणी पिणं त्वचेसाठी उपकारक त्वचेचा तजेला टिकवून ठेवण्यासाठी त्वचा हायड्रेटेड असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते, त्वचेची निगा राखण्यासाठी अधिकाधिक पाणी पिणं उपयुक्त ठरतं. तसंच संतुलित आणि सर्वसमावेशक आहारही आवश्यक आहे. ब्युटी प्रॉडक्ट्सचा होणारा अतिवापर स्किन केअर तज्ज्ञांच्या मते, 20 ते 30 या वयोगटातील मुलींनी आपल्या ब्युटी प्रॉडक्ट्सबद्दल खूप जागरूक असणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, या वयातील मुली स्किन केअर प्रॉडक्ट्सचा खूप लवकर आणि अतिवापर करतात. यामुळे त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. परंतु, ब्युटी प्रॉडक्ट्सचा अतिवापर तुमचं नैसर्गिक सौंदर्य धोक्यात आणू शकतो. हल्लीच्या जगात तुमच्या दिसण्याला, पेहरावाला खूप महत्त्च आलं आहे. यात सोशल मीडियामुळे या गोष्टींची तीव्रता वाढली आहे. परंतु, उत्तम त्वचेसाठी काही घरगुती उपाय आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन नक्कीच लाभदायी ठरेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात