जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तरुण वयातच दिसतायत वृद्धापकाळाची लक्षणं? 'या' पाच सवयी ठरतायत घातक; वेळीच व्हा सावध

तरुण वयातच दिसतायत वृद्धापकाळाची लक्षणं? 'या' पाच सवयी ठरतायत घातक; वेळीच व्हा सावध

तरुण वयातच दिसतायत वृद्धापकाळाची लक्षणं? 'या' पाच सवयी ठरतायत घातक; वेळीच व्हा सावध

वृद्धापकाळाची लक्षणे दूर ठेवण्यासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 18 डिसेंबर : तसं तर काळ कुणासाठी थांबत नाही. त्यामुळे आपलं वय झाल्यावर म्हातारं होणं ही सामान्य बाब आहे. मात्र, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, आपल्या चुकीच्या सवयींमुळे कित्येकांच्या चेहऱ्यावर लवकरच वृद्धापकाळाची लक्षणं (Fast Aging) दिसू लागली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालानुसार, 2050 पर्यंत जगभरात दोन अब्जांहून अधिक लोक 60 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असतील. आणखी एका अभ्यासानुसार हेदेखील म्हटलं गेलं आहे, की या शतकाच्या शेवटीपर्यंत माणसांचे सरासरी आयुष्य हे 120 वर्षांपर्यंत होईल. अर्थात, हे सगळं आपल्या जीवनशैलीवर अवलंबून असणार आहे. आपल्या कित्येक चुकीच्या सवयींमुळे आपलं आयुष्य तर कमी होतंच. मात्र, त्यासोबतच वय होण्याच्या आधीच वृद्ध होण्याचा धोकाही (Habits that lead to fast aging) असतो. त्यामुळे अधिक काळ तरुण रहायचं असेल, आणि भरपूर जगायचं असेल तर या सवयी सोडणंच कधीही चांगलं. अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला अकाली वृद्ध (fast aging symptoms) करत आहेत, हे आपण आज पाहणार आहोत. आज तक ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अधिक काळ ऑनलाईन यातील पहिली गोष्ट म्हणजे, अधिक काळ ऑनलाईन राहणे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे वर्क फ्रॉम होम कल्चर वाढले आहे. पण यामुळे लोकांचा स्क्रीनसमोरील वेळही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल आणि कम्प्युटरमधून निघणारा ब्लू लाईट (Ble light from screen) आपल्या डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी घातक असतो. यामुळेच वय वाढण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ लागते. डोळ्यांसोबतच मेंदूंच्या सेल्सवरही या ब्लू लाईटचा दुष्परिणाम (Blue light effect on brain cells) होतो. हे टाळण्यासाठी आपल्याला पुस्तकं वाचणं, काही लिहिणं अशा ऑफलाईन ॲक्टिव्हिटीज वाढवणं गरजेचं आहे. वाचा :  वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईही शॉक टीव्हीदेखील तेवढाच घातक केवळ मोबाईल आणि कम्प्युटर नाही, तर टीव्हीदेखील आपल्या आरोग्याला तेवढाच घातक आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणं हे दररोजचं झालं असेल, तर तुम्हाला वेळीच सावध (Effects of watching TV late night) होण्याची गरज आहे. मध्यम वयोगटात अधिकाधिक चॅनल बदलत राहण्याची सवय असणाऱ्या लोकांमध्ये विचार विनिमय करण्याची क्षमता कमी होत असल्याचे अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका अभ्यासात दिसून आले आहे. या अभ्यासानुसार, जास्त वेळ टीव्ही पाहिल्यामुळे मेंदूमधील ग्रे मॅटर (Grey Matter in brain) कमी होतं. हे ग्रे मॅटरच आपल्या विचार करण्याच्या आणि योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेला नियंत्रित करत असतं. त्यामुळे, पुढील दुष्परिणाम टाळण्यासाठी वेळीच टीव्ही पाहणं कमी करणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही टीव्ही बंद करून केवळ एका ठिकाणी दिवसभर पडून रहावं असा नाही. कायम सुस्त राहिल्यामुळेही लवकर वृद्ध होण्याची भीती असते. आळशीपणा (Laziness and fast aging) हा केवळ शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही घातक आहे. जामा मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, एकाच वयोगटातील आळशी लोकांपेक्षा ॲक्टिव्ह राहणारे लोक अधिक काळ तरुण राहतात. आळशीपणामुळे शरीर हे आजारांचे घर होऊन जाते, आणि लवकर वृद्ध होते. वाचा :  मधुचंद्राच्या रात्री ‘या’ चुका करणं टाळा, नातं बहरण्यास होईल मदत जेवढं ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, तेवढंच नियमित झोप घेणंही गरजेचं आहे. सायंटिफिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, दररोज 6 ते 8 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींची विचारक्षमता ही 4 ते 7 वर्षांनी कमी होऊ शकते. तसेच, कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींची (Effects of less sleep on skin) त्वचाही लवकर वृद्ध होऊ लागते. त्यामुळे वृद्धापकाळाची लक्षणे दूर ठेवण्यासाठी वेळेवर आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. काही लोक कायमच तणावात असतात. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खूपच लवकर सुरकुत्या दिसायला लागतात. येल विद्यापीठाच्या एका संशोधनानुसार, अकाली वृद्ध व्हायचे नसेल, तर आपल्या भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर, योग किंवा मेडिटेशनची मदत घेता येते. अशा प्रकारे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडवून तुम्ही अकाली वृद्ध होण्याचा धोका टाळू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात