Home /News /lifestyle /

मधुचंद्राच्या रात्री 'या' गोष्टींची घ्या काळजी, अशी करा नात्याची उत्तम सुरुवात

मधुचंद्राच्या रात्री 'या' गोष्टींची घ्या काळजी, अशी करा नात्याची उत्तम सुरुवात

wedding

wedding

लग्नानंतर पुरुषांना आपल्या पत्नीची जबाबदारी आणि काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी, वेगळे स्वभाव या सर्व गोष्टींचा सुवर्णमध्य काढून सोबत रहावं लागतं.

मुंबई, 18 डिसेंबर: लग्न (Marriage) प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांपैकी एक असते. लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात मोठं स्थित्यंतर येतं. स्त्री आणि पुरुष दोघांच्या जीवनात लग्नानंतर अनेक बदल होतात. स्त्रीला आपल्या आई-वडिलांचं घर सोडून सासरी जावं लागतं. सासरच्या जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर येतात. नवीन लोकांमध्ये राहून तिला या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची कसरत करावी लागते. तर, लग्नानंतर पुरुषांना आपल्या पत्नीची जबाबदारी आणि काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी, वेगळे स्वभाव या सर्व गोष्टींचा सुवर्णमध्य काढून सोबत रहावं लागतं. प्रसिद्ध लेखक डेव्ह मुअरच्या शब्दांत सांगायचं झाल्यास, जेव्हा 'इम्परफेक्ट कपल' (Imperfect couple) आपल्यातील मतभेदांचा स्वीकार करून आनंद घेतात त्याला खऱ्या अर्थानं लग्न म्हणतात. लग्नाबाबत प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आणि समज असतात. प्रत्येक नवीन जोडप्याला आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल (Married Life) उत्सुकता असते. आपल्या वैवाहिक जीवनाची चांगली सुरुवात व्हावी, यासाठी काही गोष्टींची पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. लग्नानंतर पहिल्या रात्री (First Night) काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत आणि काही गोष्टी आठवणीनं केल्या पाहिजेत. आजतकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हेही वाचा-  गोड गोड बोलून मुलींना पटवतात; 'या' राशीची मुलं फ्लर्ट करण्यात असतात अव्वल
 मधुचंद्राच्या रात्री सेक्स टाळा
लग्नानंतर पहिल्या रात्री म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री सेक्स (Sex) केलंच पाहिजे असा सर्वसाधारण समज आहे. किंबहुना प्रत्येकाची तशी इच्छाही असते. मात्र, लग्न सोहळ्याच्या दिवासाचा विचार केला तर हा दिवस वधू-वरांसाठी (Bride Groom) अतिशय धकाधकीचा असतो. दिवसभराच्या लग्नविधींमुळं जोडपं शारीरिक आणि मानसिकरित्या थकून (tiredness) जातं. विशेषत: भरजरी पेहरावामुळे मुली जास्त थकतात. म्हणूनच लग्नाच्या पहिल्या रात्री म्हणजे मधुचंद्राच्या रात्री सेक्स करण्याऐवजी एकमेकांशी भावनिकरित्या कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. एकमेकांशी गप्पा मारा आणि आराम करा. बेसिक गोळ्या-औषधंसोबत ठेवा लग्न सोहळ्याच्या गोंधळात तुमची तब्येत खराब होण्याची शक्यता असते. अॅलर्जी, डोकेदुखी, अॅसिडीटी यासारख्या गोष्टी जाणवू शकतात. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे बेसिक गोळ्या-औषधांचं मेडिकल कीट (Medical Kit) असणं गरजेचं आहे. आपल्या एखाद्या मित्र-मैत्रीणीकडं किंवा नातेवाईकाकडं ही कीट ठेवू शकता. जेणेकरून गरज पडल्यास तुम्ही ते वापरू शकता. शरीराचा विचार करू नका लग्नाच्या दिवशी प्रत्येकाच्या नजरा नवरदेव-नवरीवर असतात. त्यामुळे जास्तीत-जास्त सुंदर आणि आकर्षक दिसण्याचा प्रयत्न दोघेही करतात. आपण आपल्या पार्टनरसोबत एकदम परफेक्ट दिसलं पाहिजे, अशी चिंता त्यांना असते. साहजिकच लग्नाच्या दिवशी शरीर आणि पेहरावाबद्दल (Attire) जास्त विचार केला जातो. मात्र, या गोष्टीमुळे तुमची अस्वस्थता वाढू शकते आणि परिणामी तुमचा मूड खराब होऊ शकतो. जर तुम्ही लग्नाच्या पहिल्या रात्रीच इंटिमेट होण्याचा विचार करत असाल तर खराब झालेल्या मूडचा त्यावरही परिणाम होतो. म्हणून लग्नाच्या दिवशी शरीराबद्दल जास्त विचार करू नका. आठवणी जमा करण्याचा प्रयत्न करा लग्नाच्या दिवशी फोटोग्राफर्स आणि नातेवाईक तुमची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करतात. या सगळ्या आठवणी (Memories) तुम्हाला फोटो आणि व्हिडिओच्या रूपात आयुष्यभर जपून ठेवता येतात. याशिवाय तुम्ही आणखी काही खास आठवणी तयार करू शकता ज्या तुम्हाला नेहमी आनंद देतील. भविष्यात तुमच्या नात्यात काही कारणानं दुरावा आला तर या गोष्टींचा खूप फायदा होईल. लग्नाच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारसोबत एखादं झाड लावू शकता. इच्छा असल्यास लावलेल्या झाडाजवळ तुम्ही एखादा खास मेसेजही कोरू शकता. जेणेकरून ते झाड कायम तुम्हाला तुमच्या नात्याविषयी सकारात्मक उर्जा देईल. लग्नाच्या दिवसाच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी तुम्ही एका कागदावर सिक्रेट मेसेज लिहून बाटलीमध्ये बंद करू शकता. 10 वर्षांनंतर एकमेकांचे मेसेज वाचून नक्कीच तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल. याशिवाय तुम्ही तुमचं वेडिंग कार्ड किंवा लग्नाशी संबधित कुठलीही एक गोष्ट फ्रेम करून बेडरूममध्ये ठेवू शकता. निगेटिव्ह फिडबॅक देऊ नका सकारात्मक विचार (Positive Thinking), बोलणं आणि वागणूक या बाबी तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. 470 जोडप्यांच्या सर्वेक्षणाच्या आधारे, युनिव्हर्सिटी ऑफ जिनिव्हामधील सायकॉलॉजिस्ट मार्सेल जेंटनर (Psychologist Marcel Jentner) यांनी हे सिद्ध केलं आहे. मार्सेल जेंटनर यांच्या मते, नात्यातील रोमान्स टिकवून ठेवण्यासाठी पर्सनॅलिटींच्या कॉम्बिनेशनची नाही तर पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची गरज असते. आपल्या जोडीदाराला वाईट वाटेल अशा गोष्टी फटकळपणे बोलणं टाळलं पाहिजे. एकमेकांबद्दल पॉझिटिव्ह विचार केल्यास वैवाहिक आयुष्यात त्याचा फायदा होईल. हेही वाचा-  हिवाळ्यात या व्यायामासोबतच घ्या योग्य आहार; सांधेदुखीपासून मिळेल आराम
 वरील सर्व गोष्टी अतिशय साध्या वाटतात. मात्र, त्या नात्यावर चांगले-वाईट परिणाम करण्यास सक्षम आहेत. त्यामुळं त्यांचा विचार करून वागल्यास लग्नाचं नवीन नातं चांगल्या प्रकारे बहरेल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Marriage, Wedding

पुढील बातम्या