मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Cooking Oils: निरोगी आरोग्यासाठी ही आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी

Cooking Oils: निरोगी आरोग्यासाठी ही आहेत बेस्ट कुकींग ऑईल; हृदय दीर्घकाळ राहील हेल्दी

विशेषत: तुमच्या घरातील एखाद्याला हृदयविकार असेल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर तेल वापरताना अधिक खबरदारी घ्यायला हवी. त्याविषयी (Healthiest Cooking Oils for Heart) जाणून घेऊया.

विशेषत: तुमच्या घरातील एखाद्याला हृदयविकार असेल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर तेल वापरताना अधिक खबरदारी घ्यायला हवी. त्याविषयी (Healthiest Cooking Oils for Heart) जाणून घेऊया.

विशेषत: तुमच्या घरातील एखाद्याला हृदयविकार असेल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर तेल वापरताना अधिक खबरदारी घ्यायला हवी. त्याविषयी (Healthiest Cooking Oils for Heart) जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 28 एप्रिल : निरोगी हृदयासाठी निरोगी आहार आवश्यक आहे. विशेषत: अन्न शिजवण्यासाठी तेलाची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी, कारण शुद्ध तेल, तूप इत्यादींचा दर्जा योग्य नसल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल, चरबी आणि इतर आजार वाढण्याची शक्यता असते. शक्य असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तेल कोणते वापरायचे ते ठरवू शकता. विशेषत: तुमच्या घरातील एखाद्याला हृदयविकार असेल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर तेल वापरताना अधिक खबरदारी घ्यायला हवी. त्याविषयी (Healthiest Cooking Oils for Heart) जाणून घेऊया.

निरोगी हृदयासाठी सूर्यफूल तेल -

food.ndtv.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सूर्यफुलाच्या बियापासून तयार केलेल्या या तेलात इतर तेलांपेक्षा जास्त व्हिटॅमिन ई असते. हे हृदयासाठी उत्तम अँटिऑक्सिडंट आहे. तुम्ही ते मोहरीच्या तेलात मिसळूनही वापरू शकता. सूर्यफूल तेलामध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे ते हृदयासाठी उत्तम तेल मानले जाते. त्याचा स्मोक पॉईंट खूप जास्त आहे, त्यामुळे त्याचा जास्त वापर तळण्यासाठी केला जातो.

ऑलिव्ह ऑइल हृदयासाठी चांगले -

ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारा मुख्य प्रकारचा चरबी घटक मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् निरोगी आहारातील चरबीच्या श्रेणीत येतो. निरोगी चरबी शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करण्यात प्रभावी ठरते. सॅलडमध्ये ड्रेसिंग म्हणून तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. नियमित ऑलिव्ह ऑइलमध्ये स्मोक पॉइंट जास्त असतो आणि ते तळण्यासाठी वापरता येते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

निरोगी हृदयासाठी राइस ब्रॅन ऑइल -

तांदळाच्या कोंड्याद्वारे बनवलेले हे तेल हृदयासाठी सर्वोत्तम स्वयंपाक तेलांपैकी एक मानले जाते. यात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा आदर्श समतोल आहे. तांदळाच्या बाहेरील थराला कोंडा म्हणतात. या तपकिरी भुसामधून तेल काढले जाते. हे चवीला सौम्य आणि किंचित खमंग चवीचे आहे. हे सॅलड, कुकीज आणि केकमध्ये किंवा ग्रिलिंग आणि तळण्यासाठीही वापरले जाऊ शकते.

करडई तेल हृदय निरोगी ठेवते-

करडईचे तेल (Safflower oil) ओमेगा -6 फॅटी ऍसिडस् (लिनोलिक ऍसिड म्हणून देखील ओळखले जाते) समृद्ध आहे. हे शरीरातील कोलेस्टेरॉल संतुलित करते, रक्तवाहिन्या कडक होण्यापासून प्रतिबंधित करते आणि अशा प्रकारे, हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.

हे वाचा - सोशल हेल्थ म्हणजे काय? खराब सोशल हेल्थचे परिणाम, चांगल्या सोशल हेल्थसाठी उपाय

तिळाचे तेल खा, हृदय निरोगी ठेवा -

निरोगी हृदयासाठी तिळाचे तेल देखील चांगले आहे. बहुतेक लोक हे तेल स्वयंपाकासाठी वापरतात. त्याची चवही खूप छान असते. मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्ने समृद्ध, हे तेल त्याच्या उच्च स्मोक पॉइंटसाठी ओळखले जाते. निरोगी हृदयासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

हे वाचा - तूप खाताना थोडीशी काळजी घ्या; अशा लोकांनी जास्त खाल्ल्यास होतात नसते त्रास

सोयाबीन तेल देखील हृदयासाठी फायदेशीर -

सोयाबीन तेल हे सोयाबीनपासून काढलेले वनस्पती तेल आहे. त्यात अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् आणि प्लांट स्टेरॉल्सची चांगली विविधता आहे, जे संपूर्ण आरोग्य वाढीस प्रोत्साहन देते. ते शरीरात कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखतात. अडकलेल्या धमन्या (एथेरोस्क्लेरोसिस) आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यांसारख्या हृदयरोगाचा धोका कमी होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Health Tips