Home /News /lifestyle /

Weight Loss Tips: रात्री झोपेतही वजन कमी करायचंय? ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, नक्की दिसेल फरक

Weight Loss Tips: रात्री झोपेतही वजन कमी करायचंय? ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, नक्की दिसेल फरक

Five Healthy Drinks to Lose Weight: वजन कमी करणं ही नक्कीच सोपी प्रक्रिया नाही. मात्र काही टिप्समुळे नक्कीच वजन प्रभावीपणे कमी होऊ शकतं.

    मुंबई, 24 फेब्रुवारी : वजन कमी करण्यासाठी लोक हरप्रकारे प्रयत्न करतात. मात्र बहुतेकदा हे प्रयत्न अयशस्वीच होतात. रात्रीचं जेवण आणि रात्रीचं रूटीन या प्रक्रियेत खूप महत्त्वाचं असतं. जाणून घ्या अशा काही आरोग्यदायी पेयांबाबत (healthy drinks) जी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतील.(drinks helpful for weight loss) ही पेयं रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही पिली (drinks before sleep) पाहिजेत. कॅमोमाईल टी (chamomile tea) कॅमोमाईल टी चे फायदे सगळ्यांनाच ठाऊक आहेत. कॅमोमाईल टी शरीरात ग्लायसिनच्या प्रभावाला वाढवण्यास मदत करतो जो एका प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर आहे. हा तुमच्या नसांना आराम देतो. याच्यामुळं चांगली झोप येते. पोटासाठीही हा टी खूप चांगला आहे. रक्तातील साखर कमी करण्यास हा चहा मदत करतो. यातून वजनही कमी होतं. झोपण्याआधी एक कप गरम कॅमोमाईल टी नक्की प्या. दालचिनी चहा (Dalchini tea) दालचिनीचे फायदे खूप आहेत. भारतीय स्वयंपाकात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दालचिनी पचनक्रिया वेगवान करते. यात अँटिऑक्सिडंट आणि अँटिबायोटिक गुण असतात. दालचिनी फॅट बर्न करण्यात मदत करते. हवं तर यात एक चमचा मधही टाकू शकता. हेही वाचा- तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात का? मग तुमचं वजन वाढू शकतं! ग्रीक योगर्ट प्रोटीन शेक तुम्ही नियमित वर्कआऊट करत असाल तर झोपण्याआधी नक्की प्रोटीन शेक घ्या. तुम्ही झोपलेले असता तेव्हा प्रोटीन तुमच्या मांसपेशींची दुरुस्ती करतो. दुधात ट्रिप्टोफॅन असतं ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. मेथीदाण्याचं पाणी भिजवलेल्या मेथीचे दाणे रक्तातल्या साखरेला नियंत्रित करतात. सामान्यतः याचं सेवन सकाळच्या वेळेत केलं जातं. मात्र रात्री मेथीदाण्याचं पाणी पिण्याचे फायदेही खूप आहेत. मेथीदाणे शरीराला गरम ठेवतात. वजन कमी करायलाही ते मदत करतात. पचनसंबंधीच्या समस्याही या दाण्यांमुळे कमी होतात. हेही वाचा- तुम्ही सिंगल आहात? वाईट कशाला वाटून घेता, एकटं असण्याचे हे आहेत अनोखे फायदे हळदीचं दूध हळदीचं दूध पिण्यानं सर्दी, खोकला आणि इतर आजारांचा इलाज केला जाऊ शकतो. मात्र वजन कमी करणं आणि पचनशक्ती सुधारण्यासाठीही हे दूध उपयोगी आहे. हळदीत अँटिऑक्सिडंट्स असतात. यातून शरीरातले हानिकारक पदार्थ बाहेर निघतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Weight loss, Weight loss tips

    पुढील बातम्या