जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Healthy Heart: हृदयासाठी सकस आहाराची गरज होईल सहज पूर्ण; ही 5 प्रकारची ड्रायफ्रुट्स आजपासूनच खा

Healthy Heart: हृदयासाठी सकस आहाराची गरज होईल सहज पूर्ण; ही 5 प्रकारची ड्रायफ्रुट्स आजपासूनच खा

4. ड्रायफ्रुट्स
सुक्या मेव्यामध्ये सर्व पोषक घटक असतात. जे केस गळणे थांबवण्यास मदत करतात. जर केस गळण्याची समस्या असेल तर ताबडतोब आपल्या आहारात याचा समावेश करा. कारण या गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करणारे घटक असतात. यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो.

4. ड्रायफ्रुट्स सुक्या मेव्यामध्ये सर्व पोषक घटक असतात. जे केस गळणे थांबवण्यास मदत करतात. जर केस गळण्याची समस्या असेल तर ताबडतोब आपल्या आहारात याचा समावेश करा. कारण या गोष्टींमध्ये अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करणारे घटक असतात. यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो.

मर्यादित प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास ड्रायफ्रुट्स फायदेशीर आहेत. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होत नाही. सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : निरोगी हृदयासाठी सकस आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आपण आहारात काही ड्रायफ्रुट्सचा समावेश करू शकता. ड्रायफ्रुट्स हा अतिशय आरोग्यदायी स्नॅकचा पर्याय आहे आणि तो दीर्घ आयुष्यासाठी हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. ड्रायफ्रुट्समध्ये प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे असतात, जी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. आपण शेक, स्मूदीज, स्नॅक्स, सॅलड्स इत्यादीमध्ये ड्रायफ्रुट्सचा वापर अनेक प्रकारे करू शकता. अनेक प्रकारचे आजार बरे करण्यासाठी देखील याचा (Nuts for Healthy Heart) उपयोग होतो. मर्यादित प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. शरीरातील एलडीएल किंवा खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास ड्रायफ्रुट्स फायदेशीर आहे. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होत नाही. याव्यतिरिक्त, रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका देखील कमी होतो. यामुळे हृदयात ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. काही प्रकारचे ड्रायफ्रुट्स अमिनो अ‌ॅसिडने समृद्ध असतात, जे रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्त प्रवाह सुलभ करतात. जाणून घेऊया अशा पाच प्रकारच्या ड्रायफ्रुट्सबद्दल जे हृदयाचे कार्य सुधारून हृदय निरोगी ठेवतात- बदाम - netmeds.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार बदामामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. तसेच बदाम नियमित खाल्ल्याने लठ्ठपणा होत नाही आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून बचाव होतो. अक्रोड - अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतात. तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोस्टेरॉल्समुळे उच्च रक्तदाब कमी होतो, हृदयासोबतच संपूर्ण शरीरात रक्तप्रवाहही व्यवस्थित होतो. रोज एक ते दोन अक्रोड खाल्यास हार्ट ब्लॉकेजची समस्या उद्भवत नाही. पिस्ते खा - पिस्त्यामध्ये फायबर आणि प्रथिने देखील जास्त असतात, जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात आणि तणावपूर्ण परिस्थितीत हृदयाची क्रिया सुधारतात. हे वाचा -  40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय काजू - काजूमध्ये असलेले ओलिक अॅसिड हृदयाला निरोगी ठेवते. जर तुम्ही रोज पाच-सात काजू खाल्ले तर तुमचे हृदय योग्य प्रकारे काम करत राहील. ऑलिक अॅसिड हृदयाला निरोगी ठेवते. काजूमध्ये तांबे, मॅग्नेशियम, लोह, जस्त यांसारखे इतर अनेक पोषक घटक असतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही नियमितपणे काजूचे सेवन केले तर तुम्ही संबंधित आजारांपासून वाचू शकता. हे वाचा -  भरपूर पाणी पिणं फायदेशीर असलं तरी हे शारीरिक त्रास त्यामुळेच होऊ शकतात शेंगदाणे - शेंगदाण्याचे सेवन केल्याने हृदयालाही फायदा होतो. शेंगदाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्याला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. यासोबतच त्यात कॅलरीज, फॅट्स, फायबर, कार्बोहायड्रेट्स यांसारखे इतरही अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे तो एक आरोग्यदायी नाश्ता बनतो. जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, आठवड्यातून दोनदा शेंगदाणे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका सुमारे 15 टक्क्यांनी कमी होतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात