मुंबई, 15 जून : सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच कधी ना कधी औषधांची गरज भासतेच. अगदी छोट्या छोट्या समस्यांसाठी औषध घेण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र काही गंभीर समस्यांमुळे आपल्या शरीराला औषधांच्या मदतीची आवश्यकता असते. अशावेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅब्लेट्स घेत असतो. मात्र तुम्ही कधी हे गोळ्यांचे पाकीट निरखून पाहिले आहे का? अनेकदा गोळ्यांच्या पाकिटांमध्ये गोळ्यांसोबतच काही रिकाम्या जागा किंवा रिकामे शेल असतात (Empty Shells With Tablets). हे चुकून होत नसते तर या रिकाम्या शेलमागे काही विशिष्ट कारणे आहेत. औषधांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्याचप्रमाणे त्याची आयात-निर्यातदेखील जगभरात केली जात असते (Reason Behind Empty Shells In Tablet Strips). अशावेळी औषधे म्हणजेच ही गोळ्यांची पाकिटे हाताळताना त्याला इजा होण्याची किंवा त्याचे नुकसान होण्याचीदेखील शक्यता असते. अशावेळी या उत्पादनांचे नुकसान होऊ नये. गोळ्या किंवा टॅब्लेट्स आयात निर्यातीदरम्यान जास्त दबावामुळे मोडल्या जाऊ नये म्हणून हे रिकामे शेल तयार केले असतात. जेणेकरून जास्त भर गोळ्यांवर पडल्यास तो गोळ्यां नुकसान करू शकणार नाही (Empty Shells Protects The Tablets During Transportation) आणि नुकसान झालेच तर ते औषधाचे नव्हे तर रिकाम्या शेलचे होते.
Disadvantage Of Jackfruit: फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; Food Poisoning होण्याचा धोकाटॅब्लेटच्या पाकिटांमध्ये असलेल्या या रिकाम्या शेलमुळे केवळ गोळ्यांचे नुकसान होणारच टळते असे नाही. तर याचे आणखीही काही फायदे आहेत. अनेकदा ग्राहकांना गोळ्यांचे संपूर्ण पाकीट नको असते. तेव्हा फार्मासिस्ट्स ग्राहकांना पाकिटातून काही गोळ्या कापून देतात. अशावेळी या रिकाम्या शेलमुळे पाकिटाचे कटिंग करणे सोपे जाते आणि याचा फायदा फार्मासिस्टस आणि ग्राहक दोघांनाही होतो.
Black Jamun Benefits : तुम्हालाही आंबट-गोड जांभूळ खायला आवडतात? पाहा काय आहेत फायदेत्याचबरोबर हे रिकामे शेल गोळ्या एकमेकांसोबत मिसळू देत नाही. गोळ्या एकमेकांमध्ये मिसळल्यास ऑक्सिडायझेशन होऊ शकते. ज्यामुळे गोळ्यांचा प्रभाव कमी होतो आणि त्यांचे नुकसान होते. तसेच गोळ्यांच्या पाकिटातील हे रिकामे शेल गोळ्यांबद्दल अतिरिक्त माहिती म्हणजेच एक्सपायरी डेट, केमिकल कंपोझिशन, साईड इफेक्ट्स हे देण्यासाठीही उपयुक्त ठरतात.