जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Disadvantage Of Jackfruit: फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; Food Poisoning होण्याचा धोका

Disadvantage Of Jackfruit: फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; Food Poisoning होण्याचा धोका

Disadvantage Of Jackfruit: फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ; Food Poisoning होण्याचा धोका

फणसाचे गरे चविष्ट असतात. त्याची भाजी आणि इतर पदार्थ देखील उत्कृष्ट असतात. परंतु फणस खाल्यानंतर काही गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. कारण त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : काही लोकांना जॅकफ्रूट (How to eat Jackfruit) म्हणजेच फणस खूप आवडतो. फणसाचे गरे अतिशय चविष्ट असतात. शिवाय त्यापासून भाजी आणि इतर पदार्थ देखील बनवले जातात. पिकलेला फणस खाल्ल्याने शरीर निरोगी (Jackfruit for Health) राहतं. फणस अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. पिकलेल्या फणसात भरपूर प्रमाणात प्रोटीन (Rich in Protein) असते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर आणि लोह देखील आढळतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यास (Health Tips) मदत होते. परंतु तुम्हाला हे माहित आहे की की फण खाल्ल्यानंतर काही गोष्टी खाणे टाळायला हव्यात. त्यामुळे फणस खाल्यानंतर कोणत्या गोष्टी खाणे टाळावे (Jackfruit Benefits) हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जाणून घेऊया फणस खाल्यानंतर कोणत्या गोष्टी खाल्यास आरोग्याला धोका (Jackfruit Disadvantage) निर्माण होऊ शकतो. पपई खाणे टाळा : फणस खाल्ल्यानंतर पपई खाणे टाळावे. काही लोकांचा असा समज असतो की फणसानंतर पपई खाल्याने अन्न पचण्यास मदत होते, परंतु ते चुकीचे आहे. असे केल्यास तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि शरीरात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

मासे खाल्ल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो? नवीन संशोधन काय सांगतंय पाहा

मध खाणे टाळा : फणस खाल्ल्यानंतर मध खाणे टाळा. कारण फणसानंतर मध खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. फणसानंतर मध खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाची समस्या असलेल्या रुग्णांनी हे लक्षात ठेवावे.

भोपळा आवडत नसला तरी स्कीनसाठी नक्की वापरा; त्वचेच्या प्रकारानुसार असा होतो उपयोग

दूध पिणे किंवा खाणे टाळा : फणस खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे टाळा. कारण फणस खाल्ल्यानंतर दूध पिल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला त्वचेशी संबंधित अॅलर्जी किंवा इतर समस्या उद्भवू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात