जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरात सतत वाद, कलह होण्याची ही पण कारणं असतात; वास्तुशास्त्रचे उपाय समजून घ्या

घरात सतत वाद, कलह होण्याची ही पण कारणं असतात; वास्तुशास्त्रचे उपाय समजून घ्या

घरात सतत वाद, कलह होण्याची ही पण कारणं असतात; वास्तुशास्त्रचे उपाय समजून घ्या

वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील काही गोष्टींची विशेष खबरदारी घ्यायला हवी. वास्तुशास्त्रातील चुका आपल्या मागे अनेक संकटे आणू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जून : काही घरांमध्ये पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतात, त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. कधी-कधी ही भांडणं इतकी वाढतात की पती-पत्नीच्या नात्यात दुरावाही येतो. यामागे मानवी चुकांसोबतच वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात शांती असते, त्या घरात सुख-समृद्धी येते. त्यामुळे घरात शांतता राखणे खूप गरजेचे आहे आणि घरात वास्तुदोष असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक (Vastu Tips) मानलं जातं. इंदूरमध्ये राहणारे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा यांनी वास्तुच्या काही टिप्स सांगितल्या आहेत. त्यांचा अवलंब केल्यास तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. - घरातील देव्हारा स्वच्छ ठेवा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील देव्हारा स्वच्छ आणि नीट-नेटका ठेवावा. याशिवाय देव्हाऱ्यात देवतांची चित्रे किंवा मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत. ज्या घरात अशा चुका घडतात, त्या घरातील लोकांमध्ये कधीच चांगले संबंध राहत नाही. याशिवाय घरामध्ये देवतांची जास्त चित्रे ठेवू नयेत. - पंचमुखी दिवा मंगळवारी हनुमानजींची पूजा करताना त्यांच्यासमोर पंचमुखी दिवा लावावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. याशिवाय घरामध्ये थोडा अष्टगंध जाळावा, त्याचा सुगंध घरभर पसरतो, त्यामुळे सुख-शांती मिळते. घरात भंगार साहित्य ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्याही तुटल्या-फुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. याशिवाय घरातील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे वारंवार खराब होत असतील तर तीही बदलून घ्यावीत. घरामध्ये खराब विद्युत उपकरणे आणि भंगार साचल्यामुळे घरात संकटाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे वाचा -  विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा - शूज आणि चप्पल व्यवस्थित ठेवा वास्तुशास्त्रानुसार शूज, चप्पल घराच्या मुख्य दरवाजावर कधीही उलटे किंवा अव्यवस्थितपणे ठेवू नयेत. याशिवाय शूज आणि चप्पल घराच्या आतही इकडे तिकडे फेकू नयेत. असे केल्याने घरातील सदस्यांमधील कलह वाढतो, तसेच धनहानीही होते. हे वाचा -  Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; दिसेल चांगला परिणाम - युद्धाचा फोटो वास्तुशास्त्रानुसार महाभारत, घुबड किंवा युद्धाशी संबंधित चित्रे घरात लावू नयेत. तसेच घरात सिंह, चित्ता इत्यादी हिंसक वन्य प्राण्यांचे चित्रेही लावू नयेत. या चित्रांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात