दिल्ली, 25 एप्रिल : देशात कोरोना विषाणूूने विळखा (corona virus in india) घातला आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेत कोरोनाने भयावह रूप दाखवलं आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे आणि या भयानक संसर्गामुळे (Infection) रुग्णांना श्वसनाच्या अनेक समस्यांना (Respiratory problems) सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मास्कचा वापर केला जातो, स्वच्छता राखली जाते आहे. तुमच्या या सवयीत आता आणखी एका सवयीचा समावेश करा. ती म्हणजे एक्सरसाइज.
दररोज एक्ससाइज (Exercise)केल्याने कोरोनाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो. स्कॉटलंडच्या ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीच्या (Glasgow Caledonian University of Scotland)संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असं म्हटलं आहे की, या पहिल्याच स्टडीनुसार आशादायक माहिती मिळाली आहे. लोक कोरोना संसर्गाचे बळी ठरत असताना हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे. दररोज व्यायाम केल्याने श्वसनासंबंधी आजार टाळता येतात.
हे वाचा - Pets ना सांभाळा! महासाथीच्या काळात माणसांमुळे मांजरीलाही झाला कोरोनाचा संसर्ग
दिवसात किमान 30 मिनिटे व्यायाम केल्याने फायदा होईल. आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम आवश्य करावा. चालणे, सायकलिंग करावं. याशिवाय मसल्स बळकट करणारा व्यायाम करावा.
ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर सेबॅस्टियन चेस्टिन यांच्या म्हणण्यानुसार, दररोज एक्ससाईज केल्याने इम्युन सेल्स मजबूत बनतात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली बनते. म्हणजेच, नियमितपणे फिजिकल अॅक्टीव्हिटी करत असाल तर व्हायरल इन्फेक्शन टाळू शकता.
हे वाचा - बापरे! देशात 35 लाख अॅक्टिव्ह रुग्ण होणार, आयआयटी वैज्ञानिकांचा अंदाज
शास्त्रज्ञांच्या मते व्यायाम केल्याने कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती 31 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, तर कोरोनाने मृत्यूचा धोका 37 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona patient, Corona spread, Coronavirus, Coronavirus cases