घरातील वृद्धांना असतो डिमेन्शियाचा धोका, ही आहेत सुरुवातीची आणि सामान्य लक्षणं
घरातील वृद्धांना असतो डिमेन्शियाचा धोका, ही आहेत सुरुवातीची आणि सामान्य लक्षणं
हा आजार प्रामुख्याने 70 ते 80 वर्षे वयादरम्यानच्या लोकांना होतो. परंतु 60 वर्षे वयाच्या लोकांनादेखील त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. ज्या लोकांमध्ये डिमेंशियाची सुरुवातीची लक्षणे दिसत असतात, त्यांना संभाषणादरम्यान खूप अडचणींचा सामना करावा लागतो.
मुंबई, 5 जुलै : डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश (what is dementia in Marathi) या आजाराचा लोकांच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होतो. न्यूरोकॉग्निटिव्ह प्रकारचा आजार प्रामुख्याने 70 ते 80 वर्षं वयादरम्यानच्या लोकांना होतो. परंतु 60 वर्षे वयाच्या लोकांनादेखील त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. डिमेन्शिया (Dementia) ही एक मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. मात्र त्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. आज आम्ही या आजाराची काही लक्षणं (Early and Common Symptoms Of Dementia) सांगणार आहोत. ही सामान्य असल्यामुळे त्याकडे लक्ष दिले जात नाही. परंतु वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज असते.
मूड बदलत राहणे (Mood Changes)
मूड स्विंग हे एक लक्षण आहे ,जे अनेक समस्यांशी संबंधित आहे. परंतु वृद्ध लोकांमध्ये हे डिमेन्शियाच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. यामुळे लोकांचे कोणत्याही क्षणी मूड स्विंग होऊ शकतात.
स्टंटेड कम्युनिकेशन (Stunted Communication)
ज्या लोकांमध्ये डिमेन्शियाची सुरुवातीची लक्षणे दिसत असतात, त्यांना संभाषणादरम्यान खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात देखील अडचण येते, ज्यामुळे लोकांशी त्यांच्या संभाषणाची कार्यक्षमता आणखी बिघडते.
Hair Care : केस नैसर्गिक पद्धतीने काळे करायचेत? अशा पद्धतीने करा भोपळ्याचा वापरदिशेचा अंदाज (Sense of Direction)
रोगाच्या सुरवातीच्या काळात लोकांना दिशा ओळखण्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यांना दिशा कळत नाहीत आणि पूर्वी परिचित असलेल्या खुणा त्यांना अनोळखी वाटू लागतात.
कोणत्याही गोष्टीतील इंटरेस्ट कमी होणे (Losing Interest)
एकेकाळी त्यांना आनंद देणारे छंद आणि कृतीही डिमेन्शियाची लक्षणे असणाऱ्या लोकांना कमी महत्त्वाच्या वाटू लागतात. केवळ एखाद्या ऍक्टिव्हिटीवरच नाही तर नातेसंबंधांवरही याचा परिणाम होतो. ते मित्र आणि कुटुंबासोबत कमी वेळ घालवतात आणि भावनिकदृष्ट्या उदासीन दिसतात.
बदलांशी जुळवून घेणे (Adapting To Changes)
स्मृतिभ्रंश असलेले लोक त्यांच्या जीवनशैलीत किंवा ते राहत असलेल्या सभोवतालच्या वातावरणात होणारे बदल पाहून अस्वस्थ होतात. या बदलांमुळे त्यांना भीती किंवा चिंतादेखील वाटू शकते, ज्यामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडू शकते.
Published by:Pooja Jagtap
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.