नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : बऱ्याच वेळा देवघरातल्या मूर्ती व्यवस्थित साफ (Cleaning) न केल्यामुळे काळ्या (Black) पडतात आणि त्यांची चमक (Shine) कमी व्हायला लागते. मूर्ती साफ करण्यासाठी कपडे धुवायची पावडर किंवा भांडी घासायचं लिक्विड वापरलं तरी, त्याने ती चकाकी येत नाही आणि त्यामुळे मूर्ती जुनाट वाटायला लागतात. अशा मूर्ती साफ कशा करायच्या याच्या टिप्स (Tips) आपण जाणून घेऊयात.
चिंचेचा वापर
मूर्ती साफ करण्यासाठी चिंचेचा वापर करावा. यामुळे काही मिनिटांमध्येच मुर्त्या स्वच्छ होतात. यासाठी 20 ग्रॅम चिंच 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यामुळेही सॉफ्ट झालेली चिंच स्मॅश करुन त्याचा लगदा मूर्तीवर लावा आणि एका स्वच्छ स्क्रबरने मूर्तीवर घासा. 10 मिनिटानंतर मुर्त्या पाण्याने स्वच्छ धुवा.
(शाळा सुरू होताना बदलणार लाइफस्टाइल; आव्हानं वाढणार, करा या गोष्टींची तयारी)
लिंबू आणि बेकिंग सोडा
लिंबू आणि बेकिंग सोड्याचं मिश्रण मूर्ती साफ करण्यासाठी उपयोगी ठरू शकतो. अर्धा चमचा लिंबाच्या रसामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कापडाच्या साहाय्याने मूर्तीवर लावा. 30 मिनिटानंतर गरम पाण्याने धुवा. यामुळे मूर्तीवर पडलेले काळे डाग निघून जातात.
लिंबू आणि मीठ
पितळेच्या मूर्ती साफ करण्यासाठी अर्धा लिंबू घ्या. त्यावर 1 चमचा मीठ घाला. आता हा लिंबू मूर्तीवर घासा 5 मिनिटांनी कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ धुवा. यामुळे काळेपणा निघून मूर्तीवर चमक येईल.
(फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं)
पीठ, मीठ आणि व्हिनेगर
पितळेच्या काळ्या पडलेल्या मूर्तीसाठी पीठ, मीठ आणि व्हिनेगर या 3 पदार्थांचं मिश्रण उपयोगी ठरू शकतं. हे 3 पदार्थ एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि काळ्या पडलेल्या पितळेच्या मूर्तीवर लावा. एक तासानंतर गरम पाण्याने स्वच्छ करा. व्हिनेगरमुळे मूर्ती स्वच्छ होतात.
(व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips)
टोमॅटो केचप
मूर्ती साफ करण्यासाठी टोमॅटो केचप वापरू शकता. टोमॅटोमध्ये अॅसिड असतं. त्यामुळे पितळेच्या भांड्यांवर पडलेले डाग काढण्यासाठी टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस, टोमॅटोची पेस्ट लावल्याने खराब झालेल्या मूर्ती स्वच्छ होतात. टोमॅटो केचपने मूर्ती साफ केल्यानंतर त्यांना साबमाने धुतल्याने त्यांची चमक लवकर जाणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.