फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं
यूरिक ऍसिड वाढणं एक गंभीर समस्या (Serious problem) बनली आहे. युरिक ॲसिड वाढलं तर सांध्यांमध्ये वेदना व्हायला लागतात. फळं खाल्ल्याने युरिक ॲसिड कमी होतं.
शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढणं ही एक सामान्य समस्या असली तरी, यामुळे होणारे त्रास भयंकर आहेत. शरीरात वाढलेलं युरिक ॲसिड क्रिस्टलच्या रुपामध्ये सांध्यांजवळ जमा व्हायला लागतं. ज्यामुळे सांधेदुखी, हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा अशा समस्या व्हायला लागतात.
2/ 9
आरोग्य तज्ज्ञांच्यामते फळांमध्ये भरपूर प्रमाणावर पोषक घटक असतात. यातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स तर उपयोगी आहेतच शिवाय काही फळं युरिक ॲसिड कमी करण्यात फायदेशीर ठरतात.
3/ 9
आवोकाडो खाल्ल्यामुळे शरीरात युरिक ॲसिड वाढण्याची समस्या कमी होते. हे एक लो प्युरिन फूड आहे. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असलेलं फळ आहे.
4/ 9
त्यामुळे शरीरामध्ये सूज कमी करून फ्री रॅडिकल्स लढण्याची शक्यता देखील आवोकाडोमुळे कमी होते. अवोकाडो मधील मोनोसॅच्युरेटेड फॅट कोलेस्ट्रॉल कंट्रोल करतात.
5/ 9
फायबर भरपूर असणारं फळ म्हणजे केळसुद्धा प्युरिनची मात्रा कमी करणारं फळ आहे. केळं खाल्ल्यामुळे युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये येतं. तज्ज्ञांच्या मते दररोज केळं खाल्ल्यामुळे गाऊट अटॅकची भीती कमी होते.
6/ 9
सफरचंदामध्ये डायटरी फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे युरिक ॲसिड लेव्हल कंट्रोलमध्ये येतं. फायबर ब्लडस्ट्रीममधून युरिक ॲसिड ऍबजॉर्ब करतं आणि शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणातील युरिक ॲसिड कमी करतं यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मॅलिक ऍसिड असतं. ज्यामुळे युरिक ॲसिड न्युट्रलाइज होतं.
7/ 9
चेरी सारख्या छोट्या फळांमध्ये ॲन्थोसायनिन नावाचं नॅचरल अॅन्टीइम्फामेन्ट्री घटक असतं. त्यावेळी युरिक ॲसिड नियंत्रणात येतं.
8/ 9
संत्रं, लिंबू सारखे आंबट पदार्थ देखील टॉक्सिक प्रोडक्शन पोटोतून बाहेर टाकतात. त्यामुळे युरिक ॲसिडच्या समस्येमध्ये आंबट फळं खायला हवीत.
9/ 9
टरबूज, अननस, द्राक्ष यासारख्या फळांमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे गाऊटची भीती वाढते. त्यामुळे अशी गोड फळं यूरिक ॲसिडचा त्रास असेल तर खाऊ नयेत.