मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

शाळा सुरू होताना बदलणार लाइफस्टाइल; आव्हानं वाढणार, करा या गोष्टींची तयारी

शाळा सुरू होताना बदलणार लाइफस्टाइल; आव्हानं वाढणार, करा या गोष्टींची तयारी

महाराष्ट्रात लवकरच शाळा सुरू (School Opening) होऊ शकतात अशी चर्चा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर, गेल्या दिड वर्षात सवय झालेल्या लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle) बदल होणार आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसमोर एक प्रकारे आव्हानच उभं राहणार आहे.

महाराष्ट्रात लवकरच शाळा सुरू (School Opening) होऊ शकतात अशी चर्चा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर, गेल्या दिड वर्षात सवय झालेल्या लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle) बदल होणार आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसमोर एक प्रकारे आव्हानच उभं राहणार आहे.

महाराष्ट्रात लवकरच शाळा सुरू (School Opening) होऊ शकतात अशी चर्चा आहे. शाळा सुरू झाल्यानंतर, गेल्या दिड वर्षात सवय झालेल्या लाइफस्टाइलमध्ये (Lifestyle) बदल होणार आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांसमोर एक प्रकारे आव्हानच उभं राहणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट :  ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी (Corona Patient Rats Decreasing) होत आहेत तिथे आता शाळा सुरू (School Opening) केल्या जाणार आहेत. काही राज्यांच्या सरकारांनी (Stat Government) तसा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) याआधीच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण, टाक्स फोर्सच्या (Task Fours) सल्ल्यामुळे तो मागे घ्यावा लागला. पण, आता दिल्ली सरकराने (Delhi Government) 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून हा निर्णय लागू होईल. कादाचित महाराष्ट्रातही लवकरच शाळा सुरू होतील. एकीकडे शाळा सुरू होणार म्हणून पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर, आता रुटीन लाइफमध्ये (Routine Life) बदल होणार याचंही टेन्शन वाढलं आहे. पण, खरंतर पालक, शिक्षकांची जबादारीही वाढणार आहे. मुलांना आता शाळेचं दप्त उचलण्याचीही सवय राहिलेली नाही. तर शाळा सुरू झाल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन कसं करायचं हे आव्हान शिक्षकांसमोर आहे.

(व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips)

पालकांसमोर आव्हान

गेल्या दिड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे पालकांच एक वेगळचं रुटीन लाइफ झालं आहे. पूर्वी मुलांच्या शाळांमुळे पालक आणि विद्यार्थीसुद्धा लवकर झोपून लवकर उठायचे. तिथे आता उशीरापर्यंत जागून आरामात उठायची सवय झाली आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर या सवय झालेल्या रूटीनमध्ये बदल करणं इतकं सोप नसेल. ज्या पालकांचे ऑफिस सुरू होणार आहेत त्यांच्यासाठी तर ही तारेवरची कसरत असणार आहे. त्यांना ऑफिसची वेळ सांभाळून मुलांची तयारीही करावी लागणार आहे. मुंलांना उठवणं, त्यांना नाश्ता देणं, आंघोळ घालणं, डबा तयार करणं, शाळेत सोडणं त्यानंतर ऑफिसला निघणं या सवयी त्यांना पुन्हा लावाव्या लागणार आहेत.

(तुम्हालाही आवडतं का असं दूध? बॅक्टेरियामुळे होतील घातक आजार)

शिक्षकांसमोर आव्हान

शाळा सुरू झाल्यावर पालकांप्रमाणेच शिक्षकांसमोरही आव्हानं असतील. विद्यार्थ्यांना शाळेची पुन्हा सवय लागावी आणि दिड वर्षांनंतर होत असलेला बदल स्विकारण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करणं हे आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे. विद्यार्थ्यांना धावपळीची सवय राहिली नाही. पुस्तकांनी भरलेली बॅग घेण्याचीही त्यांना सवय राहिली नाही. तर, काही मुलांना एअर कंडिश्नर घरात 24 तास रहायची सवय झाली आहे. त्यांना शाळेच्या वर्गात तासंतास बसण कठिण होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांकडून कोव्हिड प्रोटोकॉल पाळून घेणंही चॅलेंजिंग असणार आहे.

(प्रेग्नन्सीत त्वचा झाली खराब? फेशियल, ब्लीच करण्याआधी ही माहिती वाचा)

या गोष्टी पाळाव्या लागतील

मुलांना शाळेतही मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं याची पूर्ण माहिती देऊन महत्त्व पटवून सांगा.

शाळेमध्ये कोरोना प्रोटोकॉल पाळले जात नसतील तर, त्याची माहिती मुख्याध्यापक आणि पालकांना द्यावी

शाळेत असताना तब्येतीची तक्रार असेल तर, शिक्षकांना लगेच सांगावं.

वर्गात होणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटी बद्दल विद्यार्थ्याकडून पालकांनी रोज माहिती घ्यावी.

First published:

Tags: Corona, Coronavirus, School, School teacher