मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

फक्त 10 रुपयांत कोरोनावर उपचार; गरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर दाम्पत्याची धडपड

फक्त 10 रुपयांत कोरोनावर उपचार; गरीब रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर दाम्पत्याची धडपड

कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर दाम्पत्याने सर्वांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर दाम्पत्याने सर्वांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

कोरोना महासाथीच्या काळात डॉक्टर दाम्पत्याने सर्वांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे.

  • Published by:  Priya Lad

हैदराबाद, 03 जून: कोरोनाच्या (Coronavirus) संकटात आर्थिक संकटही ओढावलेलं आहे. बहुतेकांची नोकरी गेलेली आहे. अशात कुटुंबातील एखाद्या सदस्याला कोरोना झाला आणि सरकारी रुग्णालयात काही कारणामुळे दाखल करणं शक्य नसेल तर नाइलाजाने खासगी रुग्णालयात दाखल करावं लागतं. मग या रुग्णलयात अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. पण अशा कठीण काळात अशाच रुग्णांसाठी धावलं आहे ते एक डॉक्टर दाम्पत्य. जिथं खासगी रुग्णालयं हजारोंच्या दरात फी घेत आहेत, तिथं हे डॉक्टर दाम्पत्य अवघ्या 10 रुपयांत कोरोनावर उपचार (Doctor couple give corona treatment just Rs. 10) करत आहेत.

तेलंगणाच्या पेद्दापल्ली गावातील डॉक्टर दाम्पत्याने कोरोना महासाथीच्या काळात सर्वांसमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. डॉ. राजू आणि त्यांची पत्नी पावनी कोरोना काळात गरजू आणि गरीब रुग्णांसाठी देवदूतच झाले आहेत, असं म्हणण्यास हरकत नाही. डॉ. राजू हे ऑर्थोपेडिक फिजिशिअन आहेत. तर डॉ. पावनी जनरल फिजीशिन आहेत.

हे वाचा - कोरोना रिपोर्टचं कारण सांगून फिरवत राहिले; बापाच्या खांद्यावरच लेकीने सोडला जीव

त्यांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर ते अगदी कमीत कमी दरात उपचार करतात. तर गरीबांना ते मोफत उपचार देतात. त्यांच्याकडून एकही पैसा घेत नाहीत. गावातील जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांना मोफत उपचार नाहीतर जास्तीत जास्त 10 रुपये फी आकारली जाते. या डॉक्टरांची सामान्य फी 300 रुपये होती. पण कोरोना महासाथीचं संकट लक्षात घेता त्यांनी आपली फी फक्त 10 रुपयांवर आणली आहे.

हे वाचा - दर तासाला 28 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर; मे 2021 महाराष्ट्र कधीच नाही विसरणार

कोरोना पॉझिटिव्ह आणि इतर रुग्णांची सेवा करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, असं हे डॉक्टर दाम्पत्य सांगतं. हे डॉक्टर दाम्पत्य म्हणजे या गावातील गरीब, गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने देव ठरले आहेत. त्यांना पैशांशी काहीही घेणंदेणं नाही, तर रुग्णांचा जीव वाचवणं यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे.  या गावातील लोक हातात पैसे नसले तरी योग्य ते उपचार घेऊ शकतात,या रुग्णालयात त्यांना आवश्यक ती आरोग्य सेवा मिळते.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Doctor contribution