मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /घशात लिचीची बी अडकली, कोरोना रिपोर्टसाठी रुग्णालयात फिरत राहिले; शेवटी बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

घशात लिचीची बी अडकली, कोरोना रिपोर्टसाठी रुग्णालयात फिरत राहिले; शेवटी बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

बाप मात्र लेकीचा वाचविण्यासाठी रुग्णालयभर फिरत राहिला. मदतीचा मागणीही केली, अशातच शेवटी लेकीने बापाच्या खांद्यावरच जीव सोडला.

बाप मात्र लेकीचा वाचविण्यासाठी रुग्णालयभर फिरत राहिला. मदतीचा मागणीही केली, अशातच शेवटी लेकीने बापाच्या खांद्यावरच जीव सोडला.

बाप मात्र लेकीचा वाचविण्यासाठी रुग्णालयभर फिरत राहिला. मदतीचा मागणीही केली, अशातच शेवटी लेकीने बापाच्या खांद्यावरच जीव सोडला.

बिहार, 3 जून: बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आरोग्य विभागाकडून (Health department) एक अत्यंत निष्काळजीपणा घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. येथील एका रुग्णालयात एक अगतिक बाप आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन तासनतास् फिरत होता. मात्र तरीही कोणाला दया आली नाही. डॉक्टरांनी मुलीवर उपचार न केल्यामुळे खांद्यावरच मुलीने जीव सोडला.

मुजफ्फरनगर येथील रुग्णालयात 1 जून रोजी मुसहरी प्रखंड येथील रघुनाथपूरचे राहणारे संजय राम आपल्या 8 वर्षांच्या मुलीला खांद्यावर घेऊन उपचार करण्यासाठी रुग्णालयात आले होते. मुलीच्या घशात लिचीची बी अडकली होती. (Bihar hospital negligence)

हे ही वाचा-बिल न भरल्यानं उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू, मनुष्यवधाच्या याचिकेवर आज सुनावणी

त्यामुळे उपचार करण्यासाठी संजय मुलीला रुग्णालयात घेऊन आला होता. मात्र येथे त्याच्या मुलीवर उपचारच करण्यात आले नाही. कोरोना चाचणीचं सर्टिफिकेट आणण्याच्या नावाखाली तासनतास त्याना इथे-तिथे पळवत राहिले. यातच बापाच्या खांद्यावरच मुलीचा मृत्यू झाला. यानंतर बापाचा बांध सुटला आणि तो तेथेच रडू लागला. कोणीतरी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर आजतकने यासंदर्भातील वृत्त शेअर केले आहे.

हे ही वाचा-धक्कादायक! विळ्याने सासूचा गळा कापून हत्या, जळगावातील घटनेने खळबळ

याबाबत मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, कोरोना चाचणी अहवालाच्या नावाखाली रुग्णालयातून उपचार देण्यात आला नाही. यावर रुग्णालयाच्या प्रमुख्यांनी सांगितलं की, या निष्काळजीपणावर तातडीने कारवाई करण्यात येईल. पुढे ते म्हणाले की, आपात्कालिन परिस्थितीत आधी रुग्णावर उपचार सुरू केले जातात, त्यानंतर टेस्ट केली जाते. मात्र या प्रकरणात असं झालं नाही, त्यामुळे अधिक तपासणी करण्यासं सांगण्यात आलेलं आहे.

 

First published:
top videos

    Tags: Corona, Corona updates, Corona virus in india