नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : कोरोना योद्धा (Corona Warriors) म्हटलं की सर्वात आधी समोर येतात ते म्हणजे डॉक्टर. आपला जीव धोक्यात घालून, कित्येक त्रास सहन करून कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर धडपड करत. मात्र अशीच धडपड सुरू आहे ती शिक्षकांचीही. कोरोनाच्या या परिस्थिती डॉक्टरांप्रमाणे शिक्षकही Corona Warriors ठरले आहेत.
कोरोना लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या आणि त्याऐवजी ऑनलाइन शाळा सुरू झाल्या. शिक्षकांचं काम अधिक वाढलं. मात्र ही जबाबदारी ते यशस्वीरित्या पेलत आहेत. विशेष म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचंच नाही तर क्वारंटाइन सेंटरमध्येदेखील हे शिक्षक मदत करत आहेत. देशसेवेत ते अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. अशाच काही दिल्लीतील शिक्षकांचा अनुभव पीटीआय वृत्तसंस्थेने मांडला आहे.
विद्यार्थ्यांचा शोध
पश्चिम विहारच्या सरकारी शाळेतील शिक्षिका सरिता रानी भारद्वाज यांना मार्चमध्ये राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणं खूप समस्या आली. भारद्वाज यांनी सांगितलं, "मी सुरुवातीला सर्वांना व्हॉट्सअॅप ग्रुपवर सपंपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि कित्ये वेळा सर्व विद्यार्थ्यांना फोनही केला. जेव्हा त्यापैकी काही जणांशी माझा संपर्क झाला नाही तेव्हा मी रेशन पुरवणाऱ्याशी संपर्क केला आणि त्यांचे पत्ते मिळवून त्या ठिकाणी गेली. काही विद्यार्थ्यांशी संपर्क केला काही अजूनही बाकी आहेत"
कुरिअरने पाठवली पुस्तकं
सरिता म्हणाल्या, "मी रेशन पुरवठादाराशी संपर्क करून त्या मुलांच्या शेजाऱ्यांचे फोन नंबर घेतले आणि त्यांच्या फोनवर वर्कशीट पाठवले. जेव्हा मला समजलं की ते लोक दुसऱ्या शहरात गेले आहेत. तेव्हा मी एका कुरिअर कंपनीमार्फत त्यांच्या नव्या पत्त्यावर पुस्तकं आणि अभ्यासाचे इतर साहित्य पाठवले."
क्वारंटाइन सेंटरवर सेवा
मंगोलपुरीतील सरकारी माध्यमित शाळेतील शिक्षक आलोक कुमार मिश्रा ऑनलाइन शाळा घेण्याशिवाय नरेलातील एका क्वारंटाइन सेंटरमध्येदेखील सेवा देत आहे. आलोक म्हणाले, "क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरल्या जाणाऱ्या घराबाहेर मी एका तात्पुरत्या नियंत्रण वर्गातून काम करत आहे. क्वारंटाइन सेंटरवर राहणाऱ्या लोकांना फोनवर उत्तरं देतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो"
हे वाचा - कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!
"मी अनुक्रमे दिवस आणि रात्र अशी शिफ्ट करतो. असं काम केल्याने मी लोकांची मदत करू शकतो, याचं मला खूप समाधान मिळतं. याच दरम्यान मी विद्यार्थ्यांना पाठवल्या जाणाऱ्या व्हिडीओवरदेखील काम करत असतो"
व्हिडीओ नोट्स देत आहेत राजेंद्र
अशाच पद्धतीने झडौदा कलातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र प्रसाद शर्मादेखील दुहेरी जबाबदारी सांभाळत आहेत. राजेंद्र म्हणाले, "मी व्हिडीओ नोट्स बनवून विद्यार्थ्यांना पाठवतो. त्यांना वर्कशीट बनवून पाठवतो आणि त्यांना काही अडचण असल्यास ते मला फोन करतात, मी फोनवर त्यांच्या प्रश्नाचं लगेच निरसन करण्याचं प्रयत्न करतो. कारण विद्यार्थी बहुतेक वेळा आपल्या ओळखीच्या व्यक्ती किंवा शेजाऱ्यांच्या फोनवरून बोलत असतात"
हे वाचा - कडक! लाखो रुपयांची नोकरी सोडली, नक्षलग्रस्त भागात मुलांना शिकवतंय हे दाम्पत्य
आलोक यांच्याप्रमाणेच राजेंद्रदेखील दुहेरी भूमिका बजावतात. तेदेखील क्वारंटाइन सेंटरमध्येदेखील काम करतात.
विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य राखण्याचा प्रयत्न
प्रशांत विहारच्या सर्वोदय कन्या शाळेतील शिक्षिका नीना या विद्यार्थ्यांना शिकवण्यासह त्यांचं मानसिक आरोग्य राखण्याचाही प्रयत्न करत आहेत. नीना यांनी सांगितलं, अशा अनिश्चित वेळेत निराश किंवा दुःखी होणं सामान्य आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मानसिक आरोग्य राखावं यासाठी मी प्रयत्नशील असते. तसा त्यांचा अभ्यास घेते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Teacher day