दिल्लीतील लाखो रुपयांची नोकरी सोडून एक दाम्पत्य केवळ नक्षलग्रस्त भागांमध्ये मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून जीवाचं रान करत आहे.
बिहारमधील गया जिल्ह्यापासून 60 किमी दूर असलेल्या नक्षलग्रस्त भागात कोहवरी गावामध्ये हे दाम्पत्य एक आश्रम चालवतं. या आश्रमात 26 मुलं शिकण्यासाठी येतात. या मुलांना सर्वगुण संपन्न आणि व्यवहारी ज्ञान येण्यासाठी पारंपरिक पद्धतीनं शिकवणी केली जात आहे.
अनिल आणि रेखा या दाम्पत्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागांमधील मुलांमध्ये शिक्षणाची ज्योत जागवली. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतले असून दोघेही उच्चशिक्षित आहेत. अनिल यांनी 2 विषयांमध्ये एम.ए. आणि एमफील पदवी घेतली. रेखा यांनी एम.ए. संगणक शिक्षण आणि योग यांचेही चांगले प्रशिक्षण घेतले आहे.
अनिल यांना नोकरीमध्ये समाधान मिळत नव्हते. समाजासाठी काहितरी करायला हवं असं त्यांना सतत वाटायचं. त्यामुळे दोघांनीही नोकरी सोडून गरजू मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. 2017 पासून बिहारमधील गया जिल्ह्यापासून 60 किमी दूर असलेल्या आश्रमात हे दोघंही मुलांना शिकवतात.
ही मुलं आश्रमातच राहतात. इथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षणही दिलं जातं. पुस्तकी ज्ञानासोबतच आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांना कसं समोरं जायचं याचे धडेही या शाळेत मुलांकडून गिरवून घेतले जातात.
भूदान कमिटीच्या मदतीनं आम्ही आश्रम उभा करू शकलो. सुरुवातीला शेती कऱण्याचा विचार मनात आला मात्र तेवढी जमीन नसल्यानं आपण मुलांसाठी शिकवणी सुरू कऱण्याच्या विचारावर आम्ही काम सुरू केलं. आज माझ्या मुलानंही इथेच हे काम पुढे घेऊन जावं असं अनेकांची अपेक्षा असल्याचं अनिल आणि रेखा यांनी सांगितलं.
अनिल म्हणतात की आम्हाला इथल्या मुलांना शिक्षणाचा बोजा द्यायचा नाही मुलाला स्वतः वाचा आणि शिका. त्याचसोबत स्वयंपाक, पशुपालन, शेती अशी अनेक कामंही शिकवली जातात. मोठी गोष्ट अशी आहे की 26 मुले अनुसूचित जातीची आहेत परंतु कोणतीही मूल घरी जात नाही.
या परिसरात दूर-दूर पर्यंत साधी सरकारी शाळाही नाही. त्यामुळे आम्हाला इथे खूप काही शिकायला मिळतं. जर आज हा आश्रम नसता तर आम्ही जंगलात केवळ लाकडं तोडत असतो असं तिथल्या दोन विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.