मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Teachers Day : स्वत:ला दृष्टी नसली तरी विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमय करणारा शिक्षक

Teachers Day : स्वत:ला दृष्टी नसली तरी विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमय करणारा शिक्षक

या अंध शिक्षकाने (blind teacher) विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत सतत पेटवत ठेवली आहे.

या अंध शिक्षकाने (blind teacher) विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत सतत पेटवत ठेवली आहे.

या अंध शिक्षकाने (blind teacher) विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाची ज्योत सतत पेटवत ठेवली आहे.

रायपूर, 05 सप्टेंबर ः अंध (Blind) व्यक्ती शिक्षणाचे धडे गिरवतात अशी बरीच उदाहरणं आपण पाहिली नाहीत. मात्र अशीच अंध व्यक्ती इतरांना शिक्षणाचे धडे गिरवायला शिकवते, अशी उदाहरणं दुर्मिळचं. अशा शिक्षकांपैकी एक म्हमजे छत्तीसगडमधील शिक्षक हरिशंकर कुर्रे (Harishankar Kurre). ज्यांना स्वत:ला दृष्टी (Blind teacher) नसली तरी इतरांना ते ज्ञानाचा प्रकाश देत आहेत.

हरिशंकर कुर्रे यांचा एक डोळा जन्मानंतरच खराब झाला होता. एकाच डोळ्याने अभ्यास करून ते इयत्ता आठवीपर्यंत पोहोचले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्या डोळ्यांची दृष्टीदेखील गमावली. मात्र आता मी अभ्यास कसा करणार असं रडत किंवा नशीबाला दोष देत त्यांनी आपलं शिक्षण सोडलं नाही. त्यांच्या वाटेतही अनेक अडचणी, अनेक समस्या आल्या. मात्र त्यांनी हार मानली नाही. समस्यांचा सामना करत एक-एक पाऊल त्यांनी पुढे टाकलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. डोळे नाहीत म्हणून त्यांनी आपली जिद्द सोडली नाही किंवा त्यांच्या इच्छाशक्ती कमजोर पडली नाही.

हरिशंकर म्हणतात, "माणसाने प्रत्येक परिस्थितीचा सामना करावा. एखाद्या परिस्थितीमुळे आपली पावलं मागे घेऊ नयेत."

हे वाचा - मुलांना शिकवण्यासाठी धडपड ते क्वारंटाइन सेंटरमध्ये मदत; शिक्षकही बनले Corona Warriors

धमतरी जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 70 किलोमीटर दूर नगरी परिसरात छिपली गाव आहे आणि आज याच गावातील माध्यमिक शाळेत हरिशंकर कुर्रे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांना ते समाजशास्त्र, हिंदी आणि विज्ञान शिकवतात.

आता तुम्ही म्हणाल त्यांना डोळे नाही मग ते विद्यार्थ्यांना शिकवतात कसं. तर त्यांची शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. सुरुवातीला विद्यार्थ्याकडून ते वाचून घेतात आणि ते ऐकून त्याच विषयाला सोपं करून सांगतात. डोळे नसले तरी हरिशंकर अगदी मनापासून शिकवतात. फक्त विद्यार्थीच नाही तर इतर शिक्षकांनीही त्यांचा शिकवण्याचा हा अनोखा अंदाज खूप आवडतो.

हे वाचा - कडक! लाखो रुपयांची नोकरी सोडली, नक्षलग्रस्त भागात मुलांना शिकवतंय हे दाम्पत्य

विद्यार्थिनी मुक्तेश्वरी आणि माधवीने सांगितलं, "सरांचा शिकवण्याचा अंदाज खूपच छान आहे. ते आम्हा सर्व मुलांशी खूप प्रेमाने बोलतात"

दरम्यान हरिशंकर यांना शाळेत विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांकडूनही खूप मदत होते. त्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी प्रत्येक जण घेतो. सर्वजण त्यांची प्रत्येक कामात मदत करतात. ज्ञानाचा प्रकाश तेवत ठेवणाऱ्या अशा या अंध शिक्षकाला खरंच सलाम!

First published:

Tags: Teacher day