Home /News /lifestyle /

तुमचं मूल हट्टी आणि आत्मकेंद्री तर बनत नाहीये ना? या टिप्स वापरून मुलांना वेळीच शिकवा शेअरिंग

तुमचं मूल हट्टी आणि आत्मकेंद्री तर बनत नाहीये ना? या टिप्स वापरून मुलांना वेळीच शिकवा शेअरिंग

मुलांना कोणतीही गोष्ट कधीही शेअर करायची नसेल. तर पालकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण मुलांना शेअर करण्याची सवय लावणे त्यांच्यासाठी चांगले आहे. जर मूल शेअर करायला शिकले तर ते भविष्यात जुळवून घ्यायलाही शिकेल.

पुढे वाचा ...
  मुंबई, 02 जुलै : मुलं थोडी हट्टी आणि मूडी (Stubborn And Moody) असतात. ते सहसा त्यांच्या गोष्टी इतर कोणत्याही मुलांशी शेअर करू इच्छित नाही. मुलांनी अधूनमधून असे केले तर हरकत नाही, पण जर त्याला त्याची कोणतीही गोष्ट कधीही शेअर करायची नसेल. तर पालकांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण मुलांना शेअर करण्याची सवय लावणे त्यांच्यासाठी चांगले आहे. जर मूल शेअर करायला शिकले तर ते भविष्यात जुळवून घ्यायलाही शिकेल. आज आपण मुलांना शेअरिंग शिकवण्यासाठी काही टिप्स (Tips To Teach Children Sharing) जाणून घेणार आहोत. घरातील लहान-लहान गोष्टींमधून पालक मुलांना शेअरिंगची (Teach Children Sharing) सवय लावू शकतात. यामुळे मूल सामाजिकदृष्ट्या सक्रिय देखील होईल. ही सवय लावण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे मुलांचा वाढदिवस. याच दिवसापासून तुम्ही मुलांना शेअरिंग शिकवण्याची सवय (Habit Of Sharing) लावायला सुरुवात करू शकता. या दिवशी मुलांकडून गरीब मुलांना अन्न आणि कपड्यांचे वाटप करा. याशिवाय इतरही काही पद्धती आहेत.

  Bruxism: झोपेत लोक दात का बरं चावतात? वैज्ञानिक कारण अनेकांना नाही माहीत

  parenting.firstcry.com नुसार, हे अगदी सामान्य आहे की, 3 ते 5 वर्षांचे मूल त्याच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू इच्छित नाही. पण जेव्हा पालक मुलाला शेअरिंग शिकवतात. तेव्हा मूल फक्त द्यायलाच शिकत नाही, तर टीमवर्क, समवयस्कांचे सहकार्य यांसारखी सर्व कौशल्ये शिकते. अशाप्रकारे मूल माणसांशी जोडले जाते (Socially Active Child) आणि सर्वांसोबत मिसळणे, खंबीरपणा यांसारखे गुण देखील शिकते. - शेअरिंग शिकवणाऱ्या गोष्टी मुलांना सांगा. त्यातून त्यांना गीष्टीचा गोष्टीचा सार समजावून सांगा. गोष्टीच्या स्वरूपात सांगितलेले काहीही मुलांना पटते. - घरात दोन मुलं असतील तर दोघांनाही वेगवेगळे ताट देऊन, दोघांच्याही ताटात वेगवेगळे पदार्थ वाढा आणि त्यांना एकमेकांना आपल्या ताटातील पदार्थ शेअर करायला शिकवा.

  रात्री जेवल्यानंतर लगेच झोपण्याची चूक करू नका; अनेक आजारांचं आहे ते कारण

  - मुलाने एखादी छोटीशीही गोष्ट शेअर केली तर त्याचे कौतुक करा. - एखाद्या एनजीओमध्ये जाऊन मुलांच्या हातून वस्तू शेअर वाटा आणि त्यांना समजावून सांगा की, कोणालाही काही दिल्याने किंवा वाटल्याने काहीही कमी होत नसते. या अशा काही टिप्स आहेत, त्यांच्या मदतीने मूल शेअर करायला शिकेल. त्याचप्रमाणे त्याला मुलांसोबत राहायला आणि टीमवर्क करायलाही मिळेल.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Parents and child

  पुढील बातम्या