जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चू-ही-चा, अळ्यांच्या विष्ठेपासून तयार झालेला चहा; वाचा कसा लागला शोध?

चू-ही-चा, अळ्यांच्या विष्ठेपासून तयार झालेला चहा; वाचा कसा लागला शोध?

चू-ही-चा, अळ्यांच्या विष्ठेपासून तयार झालेला चहा; वाचा कसा लागला शोध?

जपानी संशोधक सुयोशी मारुओका यांनी हा वेगळा चहा तयार केलाय. क्योटो विद्यापीठात कृषी विभागात पदवीचा अभ्यास करताना त्यांना हा चहा तयार करण्याची कल्पना सुचली.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 जानेवारी : जगभरात जेवणाच्या खूप वैविध्यपूर्ण परंपरा आहेत. अनेक विचित्र पदार्थ तयार केले जातात. ज्या गोष्टींचा खाण्यासाठी आपण कधीही वापर करत नाही, अशाही गोष्टींपासून खाण्याचे पदार्थ तयार केले जाऊ शकतात, हे ऐकून कोणालाही नवल वाटेल. मुंग्यांची चटणी, विविध प्राण्यांपासून तयार केलेले पदार्थ हे तर माहीत असतील; पण पानावरच्या अळीपासून बनवलेला चहा कधी ऐकलाय का? आणि महत्त्वाचं म्हणजे हा चहा त्या अळीपासून नाही, तर अळीच्या विष्ठेपासून तयार करण्यात आलाय. ऐकून जरा विचित्रच वाटेल; पण जपानमध्ये चू-ही-चा नावाचा हा चहा तयार करण्यात आलाय. ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, पानं खाणाऱ्या एका अळीच्या विष्ठेपासून जपानमध्ये हा चहा तयार करण्यात आलाय. चू-ही-चा असं त्याचं नाव आहे. भारताच्या काही भागांत अळीला इल्ला असं म्हणतात. झाडांची पानं खाऊन या अळ्या जगतात. जपानी संशोधक सुयोशी मारुओका यांनी हा वेगळा चहा तयार केलाय. क्योटो विद्यापीठात कृषी विभागात पदवीचा अभ्यास करताना त्यांना हा चहा तयार करण्याची कल्पना सुचली. हेही वाचा :  भारतात येणार महाभयंकर आजाराची त्सुनामी; तज्ज्ञांनी व्यक्त केली मोठी भीती विद्यापीठात ते अभ्यास करत असताना एके दिवशी त्यांच्या सीनिअरने अनेक अळ्या आणल्या. त्या अळ्यांचं काय करायचं हे सुयोशी यांना सुचत नव्हतं; पण मग त्यांना आधी खायला देऊन मग ठरवावं असा विचार त्यांनी केला. त्यांनी अळ्यांना पानं खायला दिली. त्यानंतर अळ्यांनी विष्ठा बाहेर टाकली. त्या विष्ठेचा वास त्यांना चांगला वाटला. त्यावरून त्यांना चहा तयार करण्याची कल्पना सुचली. त्या विष्ठेपासून चहा तयार केल्यावर चहाला रंग व वासही खूप छान आला. चहाचा स्वादही छान होता. त्यामुळे सुयोशी यांनी विविध प्रयोग करायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी 20 वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आणि 40 वेगवेगळी झाडं यांच्या कॉम्बिनेशनमधून एक वेगळा चहा तयार केला. किडा कोणत्या झाडाची पानं खातो, यावर त्या चहाचा रंग, वास आणि स्वाद अवलंबून असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता या चहाला बाजारात आणण्याचा विचारही ते करत आहेत. त्यासाठी क्राउड फंडिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. आत्तापर्यंत याद्वारे त्यांच्याकडे 12 लाख रुपये जमा झाले आहेत. हेही वाचा :  Shocking! अख्खं कुटुंब अज्ञात आजाराच्या विळख्यात, एकाचा मृत्यू; आठही सदस्यांची भयंकर अवस्था पाहून डॉक्टरही शॉक एखादी अळी किंवा किड्याच्या विष्ठेपासून चहा तयार करण्याचे प्रयोग याआधीही झाले आहेत. रेशमाच्या किड्यांच्या विष्ठेपासून चहा तयार केला जातो. कारण रेशमाचे किडे चहाची पानंही खातात; मात्र अशा प्रकारचा प्रयोग नवीन आहे. त्यात चहाच्या पानांव्यतिरिक्त इतर पानं खाणाऱ्या किड्यांच्या विष्ठेचा वापर चहा तयार करण्यासाठी केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: tea
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात