मुंबई, 10 ऑगस्ट : हल्ली लोकांमध्ये टॅटू काढण्याचे वेड खूप वाढले आहे. सध्या कोणत्याही वयाची व्यक्ती टॅटू काढते. कोणतीही विशेष गोष्ट करायची असेल तर टॅटूचा आधार घेतला जातो. एखाद्याचे नाव आपल्या शरीरावर कोरायचे असेल किंवा कशाचे चित्रही कोरायचे असेल यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅटूचा वापर केला जातो. सध्या सणासुदीचा काळ आहे. फेस्टिव्हल हटक्या पद्धतीने साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही खास त्या सणाशी संबंधित टॅटू तुमच्या शरीरावर काढण्याचा विचार करत असाल तर सावध राहा. शरीरावरील टॅटू हा जितका आकर्षक वाटतो तितकाच तो धोकादायकही ठरू शकतो. टॅटूबाबत केलेला थोडासा निष्काळजीपणाही जीवघेण्या समस्यांचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे टॅटू काढण्यापूर्वी त्याचे धोके जाणून घेणे फार महत्वाचे आहे. काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ? टॅटू आपल्यासाठी कसे हानिकारक असू शकतात याबद्दल दिल्लीस्थित त्वचारोगतज्ज्ञ डॉ मयुरी गुप्ता यांनी माहिती दिली आहे. डॉ मयुरी गुप्ता यांनी अमर उजाला ला माहिती देतांना सांगितले, “आता टॅटू बनवणारे लोक प्रोफेशनल आहेत आणि ते सर्व आवश्यक खबरदारीदेखील घेतात. पण जर तुम्हाला त्वचा किंवा रक्ताशी संबंधित कोणताही विकार असेल. तर टॅटू काढण्याचा विचार सोडून द्या. जोपर्यंत एचआयव्ही संसर्गामुळे होणा-या संसर्गाचा संबंध आहे, तोवर टॅटू काढणारा आणि तो करवून घेणारा या दोघांनीही काळजी घेतली पाहिजे. फेरीवाले लोक सुई, अस्वच्छता अशा चुका जास्त करतात. तुमचे शरीर टॅटूसाठी पात्र आहे की नाही हे जाणून घेणेदेखील आवश्यक आहे. अन्यथा टॅटूमुळे अनेक प्रकारचे संक्रमण देखील होऊ शकते.”
Ghee For Hair: साजूक तुपाचा वापर केल्यास केसांशी संबंधित ‘या’ समस्या होतील दूरटॅटूमुळे त्वचेचा कर्करोग होतो का? असा प्रश्न वारंवार लोकांच्या मनात घर करून राहिलेला आहे. संशोधक म्हणतात - ‘टॅटूमुळे त्वचेचा कर्करोग होतो’, हे सिद्ध होऊ शकत नाही. परंतु टॅटूच्या शाईमध्ये काही घटक असू शकतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. जेव्हा कर्करोगाचा प्रश्न येतो, तेव्हा काळी शाई विशेषतः धोकादायक असू शकते कारण त्यात बेंझो(ए)पायरीनचे प्रमाण जास्त असते. Protein Side Effect : वजन कंट्रोल करण्यासाठी भरपूर प्रोटीन घेताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम रक्तजन्य रोगांचा धोका टॅटूमुळे रक्तजन्य आजारांचा धोका हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुया सामायिक करण देखील याचे एक कारण असू शकते. स्वच्छता, सुया आणि रंग तपासण्याव्यतिरिक्त, टॅटू काढताना सर्व कर्मचारी हातमोजे घालत असल्याची खात्री करा. एकापेक्षा जास्त वेळा सुया वापरल्याने हिपॅटायटीस आणि एचआयव्ही सारख्या संसर्गाचा धोका वाढतो.