मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

CoronaVirus विरोधात लढा; योद्धांच्या मदतीसाठी विषाणूचा नाश करणारा मायक्रोव्हेव

CoronaVirus विरोधात लढा; योद्धांच्या मदतीसाठी विषाणूचा नाश करणारा मायक्रोव्हेव

BHU IIT च्या शास्त्रज्ञांनी एखाद्या वस्तूला CoronaVirus मुक्त करण्यासाठी एक डिसइन्फेक्ट मशीन तयार केलं आहे.

BHU IIT च्या शास्त्रज्ञांनी एखाद्या वस्तूला CoronaVirus मुक्त करण्यासाठी एक डिसइन्फेक्ट मशीन तयार केलं आहे.

BHU IIT च्या शास्त्रज्ञांनी एखाद्या वस्तूला CoronaVirus मुक्त करण्यासाठी एक डिसइन्फेक्ट मशीन तयार केलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

वाराणसी, 12 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (CoronaVirus) बचावासाठी कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्यापूर्वी किंवा स्पर्श केल्यानंतर हात Sanitize करता, चेह-यावर मास्क लावता, बाहेरून घरी गेल्यावर कपडे धुवायला टाकता, स्वत: अंघोळ करून व्हायरसमुक्त होता. मात्र तुमच्याजवळील इतर वस्तूंचं काय?

कोरोनाव्हायरस हा कोणत्याही पृष्ठभागावर काही काळ जिवंत राहू शकतो. त्यामुळे आपल्या जवळ असणा-या पर्स, मोबाईल, चावी, पेन अशा इतर वस्तूही Sanitize करणं गरजेचं आहे. मात्र वारंवार अशा वस्तू स्वच्छ करणं शक्य नाही, त्या खराब होण्याची शक्यताही असते. मात्र आता अशा वस्तू खराब न होता, व्हारयसमुक्त होणार आहेत, त्यासाठी विशेष असं उपकरण तयार करण्यात आलं आहे.

बीएचयू आयआयटी (BHU IIT) चे केमिकल इंजीनियरिंग विभागाचे हेड डॉ. पीके मिश्रा आणि BHU IIT चे इन्क्युबेटी गौरव सिंह यांनी मिळून हे उपकरण तयार केलं आहे.

तापाच्या लक्षणांवर आता घरचे उपचार नकोत; पुण्याच्या अधिकाऱ्यांची कळकळीची विनंती

मायक्रोव्हेवपासून हे उपकरण तयार करण्यात आलं आहे, त्यामुळे पाहता क्षणी तुम्हाला हा मायक्रोव्हेवच वाटेल. या उपकरणाच्या वरपासून खालीपर्यंत युव्हीसी ट्युब लावण्यात आल्यात. ही ट्युब कंट्रोल करण्यासाठी ट्युब सिलेक्टर आहे. ज्यामुळे उपकरणातील दोन्ही भाग बंद-चालू करता येतील. शिवाय यामध्ये टाइमरचीही सुविधा आहे. हे उपकरण अल्ट्राव्हायोलेट श्रेणीतील सी सिद्धांतावर आधारित आहे. ही किरणं bacteria किंवा व्हायरसचा लगेच नाश करतील.

Corona: ट्रम्प यांचं फेव्हरेट औषध घातक ठरलं तर? महाराष्ट्रापुढे यक्षप्रश्न

डॉ. पीके मिश्रा यांनी सांगितलं, "कोरोना योद्धांसाठी हे उपकरण खूप फायदेशीर ठरेल. कोरोनाचा लढा लढणारे फक्त योद्धाच नव्हे तर त्यांचं कुटुंबही व्हायरसपासून सुरक्षित राहावं यासाठी लवकरात लवकर हे उपकरण बाजारात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत"

"या उपकरणाची किंमत जवळपास 5000 रुपये असेल. सध्या तरी हा प्रोजेक्ट सर्टिफिकेटसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे", असं गौरव सिंह म्हणाले.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Corona