मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारतातल्या वटवाघळांमध्ये सापडला CORONAVIRUS, हा घ्या पुरावा

भारतातल्या वटवाघळांमध्ये सापडला CORONAVIRUS, हा घ्या पुरावा

भारतातील 2 जातींच्या वटवाघळांमध्ये (bats) कोरोनाव्हायरस (coronavirus) सापडला आहे.

भारतातील 2 जातींच्या वटवाघळांमध्ये (bats) कोरोनाव्हायरस (coronavirus) सापडला आहे.

भारतातील 2 जातींच्या वटवाघळांमध्ये (bats) कोरोनाव्हायरस (coronavirus) सापडला आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
नवी दिल्ली, 15 एप्रिल : जगभरात थैमान घालणारा कोरोनाव्हायरस (coronavirus) नेमका आला कुठून हे स्पष्ट झालेलं नाही. सुरुवातीला साप आणि त्यानंतर वटवाघळाकडून (bats) हा व्हायरस माणसांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जातं आहे. तर आता वटवाघळात कोरोनाव्हायरस आहे, याचा पुरावा भारताने दिला आहे. भारतातील 2 जातींच्या वटवाघळांमध्ये कोरोनाव्हायरस सापडला आहे. Indian flying fox आणि Rousettus या वटवाघळांमध्ये कोरोनाव्हायरस असल्याचं दिसून आला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (Indian council of medical research - ICMR) आणि पुण्यातील NIV (National institute of virology) ने एकत्रित हा अभ्यास केला आहे, त्यामध्ये वटवाघळांमध्ये कोरोनाव्हायरसचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं आहे.इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (indian journal of medical research) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ICMR-NIV ने 10 राज्यांतील वटवाघळांचे rectal आणि throat swab sample तपासले. यामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, गुजरात, ओडिशा, तेलंगणा, चंदीगड, पद्दुचेरीचा समावेश आहे. जगभरातील अशा लॅब जिथे कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसवर सुरू आहेत प्रयोग 508 नमुने Indian flying fox तर 78 नमुने Rousettus जातीच्या वटवाघळाचे आहेत. Rousettus वटवाघळाचे 4 आणि Indian flying fox वटवाघळाचे 21 असे एकूण 25 नमुने BtCov पॉझिटिव्ह आलेत.Rousettus वटवाघळाचे चारही नमुने केरळातील आहेत. तर Indian flying fox वटवाघळाच्या पॉझिटिव्ह नमुन्यांपैकी 12 केरळ, 6 पद्दुचेरी, 2 हिमाचल प्रदेश आणि एक तामिळनाडूतील आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जातीच्या वटवाघळांचे rectal swab samples पॉझिटिव्ह आलेत, तर throat swab samples नेगेटिव्ह आलेत. CoronaVirus नेमका आहे तरी कसा? 5 महिन्यात उलगडलेली विषाणूची रहस्यं वटवाघळांची रोगप्रतिकारक प्रणाली विविध व्हायरसशी लढा देण्यासाठी सक्षम असते, मात्र हे व्हायरस जेव्हा एखाद्या माध्यमातून माणसांपर्यंत पोहोचतात तेव्हा ते घातक ठरतात. मात्र या कोरोनाव्हायरसचा माणसांवर दुष्परिणाम होईलच असं आता म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण असा अभ्यास झालेला नाही. असंही अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या