मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

कोरोना लशीबाबत अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय

कोरोना लशीबाबत (corona vaccine) कोणतीही माहिती पसरवताना आधी नीट विचार करा.

कोरोना लशीबाबत (corona vaccine) कोणतीही माहिती पसरवताना आधी नीट विचार करा.

कोरोना लशीबाबत (corona vaccine) कोणतीही माहिती पसरवताना आधी नीट विचार करा.

    नवी दिल्ली, 25 जानेवारी : देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण (corona vaccination) सुरू झालं आहे. कोरोना लशींचे (corona vaccine) काही दुष्परिणाम (side effect) समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर काही जणांचा मृत्यूही झाला आहे. पण हे मृत्यू लशीमुळे झालेले नाहीत हे सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण तरी लशीबाबत लोकांच्या मनात संभ्रम कायम आहे. अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. त्यात सोशल मीडियावर लशीबाबत अफवा (rumours on corona vaccine) पसरल्या जात आहेत. पण आता अशा लोकांची काही खैर नाही. कारण लशीबाबत अफवा पसरवण्यांबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लशीबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी असे निर्देश दिले आहेत. भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन दोन्ही लशी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे कोरोना लशीबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्याविरोधात योग्य ती पावलं उचलवीत आणि दंडात्मक कारवाई करावी, असं त्यांनी सांगितलं आहे. Disaster Management Act 2005 आणि  Indian Penal Code, 1860 या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी सर्व राज्यांना दिले आहेत. हे वाचा - कोरोना काळात दिवस-रात्र झटली 'योद्धा'; लस घेतल्याच्या तिसऱ्या दिवशी मृत्यू नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.  मोदी म्हणाले,  ''भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे. आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे" हे वाचा - Good News : कोरोना व्हायरस रोखणारा ‘नेजल स्प्रे’ तयार, लवकरच बाजारात येणार! दरम्यान  ही लस घेणारे एम्सचे  (AIIMS) संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड 19 टास्क फोर्सचे (National Task Force on COVID19) सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी सांगितलं, "लोक कोणत्याही प्रकारची औषधं घेत असतील तर त्यांना लशीमुळे काही अॅलर्जीक रिअॅक्शन होऊ शकते. शरीरात वेदना, लस घेतलेल्या शरीराच्या भागावर वेदना, सौम्य ताप असे सामान्य साइड इफेक्ट होऊ शकतात. पण 10 टक्क्यांपेक्षा कमी लोकांनाच या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.  लशीमुळे हार्ट अटॅक येऊ शकत नाही. देशात लशीमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या