विशाखापट्टणम, 24 जानेवारी : आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात रविवारी एक आशा सेविकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या सहकाऱ्यांनी आरोप केला आहे की, कोविज-19 लसीकरणानंतर तिचा मृत्यू झाला. गुंटूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सॅम्युअल आनंद यांनी सांगितलं की, आशा कार्यकर्त्याच्या मृत्यूचं कारण पोस्टमार्टमनंतर समोर येईल. सोबतच त्यांनी सांगितलं की, आठ दिवसात 10,999 आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. ज्यामध्ये प्रतिकूल परिणाम झाल्याचं एकही प्रकरणं दिसलं नाही.
गवर्नमेंट जनरल रुग्णालयात आशा कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर अन्य आशा सेविकांनी रुग्णालयात आंदोलन केलं आणि पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेन युनियन्सचे एक नेत्याच्या नेतृत्वा विरोध प्रदर्शन करण्यात आलं आणि जेव्हा जिल्हाधिकारी मृत महिलेच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले तर त्यांच्यासोबतही वाद झाल्याचे पाहायला मिळलं.
हे ही वाचा-धक्कादायक! कोरोना लसीकरणानंतर आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, ते राज्य सरकारला कोरोना महासाथीत लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मृत्यूबाबत बोलतील, शिवाय तिच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करतील. त्यांनी कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याव्यतिरिक्त घरासाठी भूखंड देण्याचं वचन दिलं आहे. विषेश म्हणजे कोरोना व्हायरसचं लसीकरण केल्याच्या तीन दिवसांनंतर 22 जानेवारी रोजी 44 वर्षीय आशा सेविकेचं डोकं दुखणे आणि तापाचा त्रास जाणवत होता. आशा कार्यकर्त्याच्या भावाने सांगितलं की, आम्ही पहिल्यांदा तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेलो होतो. मात्र तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. ती शारिरीकदृष्ट्या निरोगी होती आणि कोरोना महासाथीदरम्यान न थकता ती दिवस-रात्र काम करीत होती. त्यांनी महिलेला ब्रेन स्टोक झाल्याचं अमान्य केलं आहे. येथील काही डॉक्टरांनी महिलेला स्ट्रोक आल्याचा दावा केला होता.