Good News : कोरोना व्हायरस रोखणारा ‘नेजल स्प्रे’ तयार, लवकरच बाजारात येणार!

Good News : कोरोना व्हायरस रोखणारा ‘नेजल स्प्रे’ तयार, लवकरच बाजारात येणार!

कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या जगासाठी एक चांगली बातमी आहे. ब्रिटनच्या (Britain) बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक खास ‘नेजल स्पे’ (nejal spray) बनवला आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्व जगच बदललं आहे. जगाचा 2020 मधील बहुतेक काळ हा लॉकडाऊनमध्ये गेला. आता लॉकडाऊचे नियम शिथिल झाले असले तरी अनेक निर्बंध कायम आहेत. सार्वजनिक वाहतूक तसंच शाळा-कॉलेज  यासारख्या गोष्टी अजून पूर्णपणे सुरु झालेल्या नाहीत. या गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा होणारा संसर्ग रोखण्यासाठी ही खबरदारी सध्या घेतली जात आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या जगासाठी एक चांगली बातमी आहे. ब्रिटनच्या (Britain) बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक खास ‘नेजल स्पे’ (nejal spray) बनवला आहे. या स्प्रेमुळे दोन दिवसांपर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याचं काम होऊ शकतं. यावर्षी उन्हाळ्यापर्यंत हा स्प्रे औषधांच्या दुकानात उपलब्ध होईल, असा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्रानं केला आहे.

कुठे होणार उपयोग?

या विषयातील मुख्य संशोधक डॉ. रिचर्ड मोक्स यांनी ‘द संडे टेलिग्राफ’शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार ‘सार्वजनिक ठिकाणी वावरताना पाळावं लागणारं बंधनं कमी करण्यासाठी तसंच शाळा पुन्हा सुरु होण्यासाठी याचा उपयोग होईल. अर्थात या ‘नेजल स्प्रे’ ला अजून कोणतंही नाव दिलेलं नाही. हा स्प्रे बनवण्यासाठी जी रसायनं वापरण्यात आली आहेत, त्यांना मेडिकल उपयोगासाठी वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसंच ती मानवी वापरासाठी देखील सुरक्षित आहेत.

येत्या उन्हाळ्यापर्यंत हा स्प्रे वापरण्यास उपलब्ध होईल अशी आशा मोक्स यांनी व्यक्त केली आहे. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी दिवसातून चार वेळा हा स्प्रे वापरावा लागेल, अशी माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिली आहे. त्याचबरोबर शाळा तसंच गर्दीच्या अन्य ठिकाणी दर वीस मिनिटांनी हा स्प्रे वापरला जाऊ शकतो.

ब्रिटनची परिस्थिती गंभीर

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसचा (New Coronavirus Strain) प्रसार वाढल्यानंतर या स्प्रे बाबतची बातमी समोर आली आहे. नव्या कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमधील अनेक भागांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्य देशांनीही ब्रिटनशी होणाऱ्या वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 25, 2021, 1:43 PM IST
Tags: corona

ताज्या बातम्या