मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

85 वर्षांची 'तरुणी' शोधतेय नवा बॉयफ्रेंड, नुकताच झालाय तिशीतल्या मुलाशी ब्रेकअप

85 वर्षांची 'तरुणी' शोधतेय नवा बॉयफ्रेंड, नुकताच झालाय तिशीतल्या मुलाशी ब्रेकअप

हौसेला मोल नसतं आणि प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. अमेरिकेतील एका 85 वर्षांच्या तरुणीला हे अगदी तंतोतंत लागू होतं.

हौसेला मोल नसतं आणि प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. अमेरिकेतील एका 85 वर्षांच्या तरुणीला हे अगदी तंतोतंत लागू होतं.

हौसेला मोल नसतं आणि प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. अमेरिकेतील एका 85 वर्षांच्या तरुणीला हे अगदी तंतोतंत लागू होतं.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 8 जुलै : हौसेला मोल नसतं आणि प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. अमेरिकेतील (America) एका 85 वर्षांच्या तरुणीला (85 year old) हे अगदी तंतोतंत लागू होतं. एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा या आजींचा उत्साह आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) राहणाऱ्या हैट्टी रेट्रोगे (Haiti Retroge) नावाच्या या आजाबाईंना एका तरुण आणि तडफदार बॉयफ्रेंडची (Boyfriend) प्रतीक्षा आहे. त्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

नुकताच झाला ब्रेकअप

या आजी 39 वर्षांच्या एका तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या आणि दोघंही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्यांचं एकमेकांशी पटेनासं झालं आणि दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र ब्रेकअपनंतर आजींना फारच सुनंसुनं आणि एकाकी वाटू लागलं आणि त्यांनी पुन्हा एकदा नव्या उत्साहानं नवा बॉयफ्रेंड शोधायला सुरुवात केली. बंबल नावाच्या एका डेटिंग ऍपची त्यांनी यासाठी मदत घेतली असून बॉयफ्रेंडचा शोध सुरू ठेवला आहे.

प्रेमाचा शोध

हैट्टी यांचा 1984 साली घटस्फोट झाला होता. पती पैसे कमावण्यासाठी पुरेशी मेहनत करत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना दोन मुलं आणि तीन नातवंडं आहेत. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्या सतत प्रेमाचा शोध घेत राहिल्या आणि आपल्यापेक्षा वयानं कमी असणाऱ्या तरुणांसोबत रिलेशनशीप बनवत राहिल्या.

हे वाचा -बाळ होण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केली; जन्मलं डाऊन सिंड्रोम मूल मग आईने...

इस्त्रायलमधून आलं प्रपोजल

सध्या इस्त्रायलमधील एका व्यक्तीनं हैट्टी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला असून आपला त्यांच्यावर ‘क्रश’ असल्याचं म्हटलंय. सध्या आपण कुणासोबतही डेट करत असून एकट्या आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र या एकटेपणाचा आपल्याला त्रास होत असून लवकरच आपल्याला एक अनुरुप बॉयफ्रेंड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्याला 35 पेक्षा कमी वय असलेला बॉयफ्रेंड हवा आहे, अशी जाहीरातही त्यांनी वर्तमानपत्रात दिली आहे. यापूर्वी अमेरिकेतील काही टीव्ही शोजमध्ये त्या आल्या होत्या आणि त्यांच्या या लाईफस्टाईलविषयी त्यांच्या अनेक ठिकाणी मुलाखतीही झाल्या आहेत.

First published:

Tags: America, Love story