मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'मी सुष्मिता सेनच्या मुलींचा बाबा', बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा मोठा खुलासा

'मी सुष्मिता सेनच्या मुलींचा बाबा', बॉयफ्रेंड रोहमन शॉलचा मोठा खुलासा

रोहमन शॉलनं (Rohman Shawl ) अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) आपल्या नात्याबाबत सांगताना बरंच काही काही सांगितलं आहे.

रोहमन शॉलनं (Rohman Shawl ) अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) आपल्या नात्याबाबत सांगताना बरंच काही काही सांगितलं आहे.

रोहमन शॉलनं (Rohman Shawl ) अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतच्या (Sushmita Sen) आपल्या नात्याबाबत सांगताना बरंच काही काही सांगितलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 फेब्रुवारी : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl ) हे कपलही चर्चेत असतं. दोघंही आपल्या सोशल मीडियार अॅक्टिव्ह असतात. आपलं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांसह शेअर करत असतात. हे दोघं आणि सुष्मिताच्या मुली एका कुटुंबाप्रमाणेच आनंदात राहतात.  त्यामुळे सुष्मिता आणि रोहमन लग्न कधी करणार याची प्रतीक्षा त्यांच्या चाहत्यांना आहेच. याच दरम्यान आता रोहमननं एक मोठा खुलासा आहे. आप सुष्मिता सेनच्या मुलींचा बाबा आहोत, असं त्यानं सांगितलं.

29 वर्षांचा रोहमन शॉल हा एक मॉडल आहे. पण सुष्मिता सेनचा बॉयफ्रेंड म्हणून तो जास्त चर्चेत असतो. टाइम्सशी बोलताना रोहमननं आपल्या आणि सुष्मिताच्या प्रेमाबाबत बरंच काही सांगितलं आहे.

रोहमन म्हणाला, "मी मूळचा काश्मीरचा आहे पण माझा जन्म नैनितालचा. नैनितालमध्ये शालेय शिक्षण आणि डेहराडूनमध्ये इंजिनीअरिंग केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मॉडलिंग सुरू केली. त्यानंतर सहा वर्षांनी मी मुंबईत आलो. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी मला सुष्मिता भेटली. त्यानंतर माझं आयुष्यच बदललं"

हे वाचा - मनोरंजन क्षेत्रात पुन्हा खळबळ! आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या

"मी खूप नशीबवान आहे की सुष्मितासोबत आहे. सुष्मिता फक्त एक व्यक्ती नाही तर एक आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगणारी अशी माणूस आहे. तिला समजून घ्यायला थोडा वेळ लागतो पण एकदा तुम्ही तिला ओळखलं तर त्यापेक्षा चांगला अनुभव कोणताच नाही. खूप प्रेमळ आहे, तिचे विचारही चांगले आहेत. मी तिच्यावर एक पुस्तक लिहू शकतो", असं त्यानं सांगितलं.

सुष्मिताशी लग्न करण्याबाबत तो म्हणाला, "मी, सुष्मिता आणि तिच्या मुली रेने, एलिशा एका कुटुंबाप्रमाणे राहतो. मी या मुलींचा बाबा आहे, त्यांचा एक मित्रही आहे. एका सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणेच आम्ही भांडतो आणि मजामस्तीही करतो. राहिला प्रश्न लग्नाचा तर आम्ही त्याबाबत फारसा विचार करत नाही. आमच्या कुटुंबाकडूनही दबाव नाही. हो, पण लग्न करू तेव्हा लपवणार नाही"

हे वाचा - जाहिरात कंपन्यांनी कंगनासोबतचे करार केले रद्द; म्हणाली, राष्ट्रसेवा हीच संपत्ती!

"आमच्या वयातील 15 वर्षे वयाचं अंतर महत्त्वाचं नाही. जेव्हा एखादी शक्तिशाली महिला तुमच्या आयुष्यात येते तेव्हा एक पुरुष मॅच्युअर होतो आणि त्याला स्वतःमध्ये बदल झालेले दिसतात. माझ्यामुळे सुष्मिताच्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये, यासाठी मी प्रयत्न करते. तिच्यासोबत माझं नाव जोडलेलं आहे आणि मी त्याची खूप इज्जत करतो आणि करत राहेन", असं रोहमन म्हणाला.

First published:

Tags: Actress