मुंबई, 06 फेब्रुवारी: गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडची पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी चर्चेत आहे. ती केवळ तिच्या चित्रपटासाठीच नाही, तर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी (Controversial Statement) नेहमी बातम्यांमध्ये येत आहे. कंगना रणौत सोशल मीडियावर (Social media) खूपच अॅक्टीव्ह असते. ती नेहमी राष्ट्राच्या ज्वलंत मुद्यांवर आपली मतं व्यक्त करते. तिच्या या टिप्पणीमुळे तिला अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. कारण कोणत्याही मुद्यांवर टोकाची मतं मांडण्यासाठी कंगना नेहमी आघाडीवर असते.
आता अभिनेत्री कंगना रणौतने शुक्रवारी आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिने तिच्यासोबत झालेले व्यावसायिक करार रद्द केल्याचं म्हटलं आहे. तिने यावेळी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, 'मला फुशारक्या मारायच्या नाहीत, पण मी कधीही फेअरनेस क्रिमची जाहीरात करत नाही. त्याच बरोबर आयटम सॉंग, कार्यक्रम किंवा बड्या अभिनेत्यासोबत चित्रपट करत नाही. आणि आता माझ्या सगळ्या बॅन्ड्सनी माझे करार रद्द केले आहेत. त्यामुळे अजूनही मी जे काही कमवते, त्यातील बहुतांशी संपत्ती मी दान करते. त्याच्या बदल्यात मला आणखी फायदा होतो.'
I don’t mean to brag,I don’t do fairness creams,item numbers,shows,big hero films and now all brands cancelled my contracts also,still whatever little I earn most of it I give away and in return gain so much more,not able to express how to encourage people to give,that’s all
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2021
या नंतर कंगनाने आणखी एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये तिने म्हटलं की, 'तुम्ही देशासाठी जे काही करता, तिच खरी संपत्ती आहे. देशाप्रती असलेलं तुमचं प्रेम, ज्ञान आणि संस्कृती रक्षण अशा काही गोष्टी आहेत, ज्याची मी प्रशंसा करते. मला आशा आहे की, आपण एकत्र काहीतरी काम करू ज्यामुळे आपली मैत्री वाढेल.
What you doing for this nation is real wealth, your passion and knowledge of this nation and protectiveness for this civilisation is something I admire and I would like to acquire from you, hope we work on something together and get to be friends
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2021
कंगना रणौत ट्विटरवर आल्यापासून ती खूपच सक्रिय झाली आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवर ती सतत आपली मतं मांडताना दिसते. सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर ती सोशल मीडियावर सर्वात जास्त आवाज उठवताना दिसली. तेव्हापासून तिने तिच्या बोलण्याची धार कधीच कमी होऊ दिली नाही.
दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरही तिने सोशल मीडियावर भाष्य केलं आहे. यानंतर कंगनाने अमेरिकन पॉप सिंगर रिहानावरही ट्विट केलं आहे. रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत एक बातमी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर करत 'आपण यावर काहीच का बोलत नाही?' असा प्रश्व उपस्थित केला होता. या ट्वीटला कोट करत कंगना रणौतने रिहानाला मूर्ख म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर तिने पुढे लिहिलं की, 'आम्ही शेतकरी आंदोलावर बोलत नाही, कारण आंदोलनात शेतकऱ्यांच्या वेशात दहशतवादी गोंधळ घालत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Kangana ranaut