मुंबई, 25 ऑक्टोबर : या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक अमावस्या तिथीला सूर्यग्रहण होईल. धर्मावर विश्वास ठेवणारे लोक सुतकांचे नियम नक्कीच पाळतात. पंडित शक्ती जोशी यांच्या मते ग्रहण नेहमी पौर्णिमा किंवा अमावास्येला होते. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. ग्रहण काळात खाणे पिणे देखील निषिद्ध आहे.
धार्मिक मान्यतेनुसार सूर्यग्रहण राहु-केतूमुळे होते. दुसरीकडे, जर आपण त्याच्या वैज्ञानिक कारणाबद्दल बोललो, तर जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. यावेळी भारतातील काही भागांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे. आज आम्ही तुम्हाला सूर्यग्रहण लाईव्ह दाखवणार आहोत. आधी सूर्यग्रहणाच्या वेळा पाहा.
Solar Eclipse 2022 : ग्रहण काळात काहीही खाणे अशुभ का मानले जाते? जाणून घ्या कारण
महाराष्ट्रात कोणत्यावेळी दिसेल ग्रहण
मुंबई - 04:49 PM ते 06:09 PM
पुणे - 04:51 PM ते 06:06 PM
कोल्हापूर - 4:57 PM
नागपूर - 4:49 PM
नाशिक - 4:47 PM
येथे पाहा लाईव्ह सूर्यग्रहण
भारतात सूर्यग्रहण कुठे आणि कोणत्या वेळी दिसेल?
नवी दिल्ली - दुपारी 04:28 ते संध्याकाळी 05:42 पर्यंत
कोलकाता - 04:51 PM ते 05:04 PM
चेन्नई - 05:13 PM ते 05:45 PM
पाटणा - 04:42 PM ते 05:14 PM
जयपूर - 04:31 PM ते 05:50 PM
लखनौ- दुपारी 04:36 ते संध्याकाळी 05:29
हैदराबाद- दुपारी 04:58 ते संध्याकाळी 05:48
बंगळुरू - संध्याकाळी 05:12 ते संध्याकाळी 05:56 पर्यंत
अहमदाबाद - 04:38 PM ते 06:06 PM
भोपाळ - 04:42 PM ते 05:47 PM
चंदीगड - दुपारी 04:23 ते संध्याकाळी 05:41
मथुरा - संध्याकाळी 04:31 ते संध्याकाळी 05:41
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Live video, Religion