मुंबई, 24 ऑक्टोबर : आज देशात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे सूर्यग्रहण असेल, जे देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दिसणार आहे. प्रत्येक ठिकाणी या सूर्यग्रहणाची वेळही वेगळी असेल. द्रुक पंचांगनुसार, 25 ऑक्टोबर रोजी देशातील सूर्यग्रहण संध्याकाळी 4:28 वाजता सुरू होईल आणि सुमारे 5.30 वाजता संपेल. देशात दिसणारे हे दुसरे सूर्यग्रहण असेल, जे अंशतः पाहता येईल. सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, ते पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात. वास्तविक, काहीवेळा ते उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहणे हानिकारक ठरू शकते. अनेकदा गरोदर महिलांना सूर्यग्रहण पाहण्यास मनाई असते. कारण, त्याचे दुष्परिणाम आईसोबतच पोटातील बाळालाही होऊ शकतात. चला जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. सूर्यग्रहण गर्भवती महिलांसाठी हानिकारक आहे का? काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या मते, सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. यावेळी गरोदर महिलांसोबतच प्रत्येकाने काही विशेष खबरदारी घ्यायला हवी. ग्रहणाच्या वेळी काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत. सूर्यग्रहणाचा परिणाम कोणत्या व्यक्तीवर कसा होईल हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण स्वत:सोबत गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी घराबाहेर न पडल्यास बरे होईल. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये 1. धार्मिक मान्यतेनुसार या काळात अन्न टाळावे. असेही म्हटले जाते की ग्रहणाच्या दुष्परिणामांमुळे अन्न देखील दूषित होऊ शकते. जेवणात तुळशीची पाने, गंगाजल मिसळणे चांगले. 2. जर तुम्ही गरोदर असाल तर सूर्यग्रहण काळात कात्री, चाकू इत्यादी गोष्टींचा वापर टाळा. तसेच, आपण शिवणकाम-भरतकाम केले नाही तर ते चांगले आहे, कारण सुई वापरण्यास देखील मनाई आहे. त्यांचा वापर केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वाचा - Diwali 2022 : मधुमेही रुग्णही घेऊ शकतात मिठाईचा आस्वाद, फक्त साखरेऐवजी या गोड पदार्थांचा करा वापर 3. जोपर्यंत तुमच्या शहरात सूर्यग्रहण दिसत नाही तोपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नये. तुमच्या बाळाला कोणतीही हानी होणार नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पोटावर गेरू लावू शकता. 4. यादरम्यान गर्भवती महिलांनी भाजीपाला कापणे टाळावा. असे केल्याने गर्भातील बाळाचा विकास योग्य प्रकारे होत नाही असे म्हणतात. 5. तुम्ही कोणत्याही प्रकारे सूर्यग्रहण पाहणे टाळावे. याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सूर्यग्रहणाची किरणे तुम्हाला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत घराच्या खिडक्याही बंद ठेवा.
6. धार्मिक मान्यतेनुसार, या काळात तुम्ही झोपणे टाळावे आणि हनुमान चालीसा आणि माँ दुर्गा पाठ करावे. यामुळे नकारात्मक शक्ती लवकर दूर होतील. सूर्यग्रहण संपल्यावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. गर्भवती महिलेने ग्रहण काळातील अंधश्रद्धांना दिली मूठमाती ग्रहण काळात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा अंधश्रद्धांचीच अधिक चर्चा होते. विशेषतः गर्भवती महिलांवर अनेक निर्बंध घातले जातात. इस्लामपुरातील (जि. सांगली) समृद्धी चंदन जाधव या गर्भवतीने मात्र ग्रहण काळात पाळल्या जाणाऱ्या सर्व प्रथा आणि अंधश्रद्धांना मूठमाती दिली. महाराष्ट्र अंनिसने याबाबत पुढाकार घेऊन ग्रहणाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करण्यासाठी उपक्रम आयोजित केला होता. यानंतर जन्माला आलेलं बाळ अगदी निरोगी होतं. इस्लामपुरातील महात्मा फुले कॉलनीमध्ये गर्भवती महिला समृद्धी जाधव यांनी रविवारी पिढ्यानपिढ्या असणाऱ्या ग्रहणाच्या अंधश्रद्धा दूर केल्या. ग्रहणाच्या काळात भाजी चिरणे, फळे कापणे, झाडांची फळे, पाने तोडणे, अन्न खाणे, पाणी पिणे, हाताची घडी घालणे यासह विविध शारीरिक हालचाली करत ग्रहण पाहण्याचाही आनंद घेतला. समृद्धी या बारावी उत्तीर्ण आहेत. त्यांनी चंदन जाधव या युवकाशी आंतरजातीय विवाह केला आहे. समृद्धी यांच्या सासू सिंधुताई जाधव आणि कुटुंबीयांनी त्यांना अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गर्भवती महिलांनी ग्रहण पाळणे ही अंधश्रद्धा असल्याचा संदेश सर्वांना देण्यासाठी जाधव कुटुंबीयांनी महाराष्ट्र ’ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘च्या पुढाकारातून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. घराच्या अंगणात ग्रहण काळात फळे, अन्न सेवन करण्यासह उपस्थितांचे प्रबोधनही करण्यात आले. हा प्रयोग 2020 साली करण्यात आला होता.