मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भलतंच! पिझ्झा खाण्याच्या पद्धतीवरून कळतो स्वभाव, तुम्हीही अशा पद्धतीनं खाता?

भलतंच! पिझ्झा खाण्याच्या पद्धतीवरून कळतो स्वभाव, तुम्हीही अशा पद्धतीनं खाता?

पिझ्झा खाण्याची पद्धत आणि स्वभाव

पिझ्झा खाण्याची पद्धत आणि स्वभाव

तसं तर बहुतांश लोक पिझ्झा त्रिकोणात तोडून खाणं पसंत करतात. काही लोक याचा रोल बनवून खातात तर काही लोक चक्क काटा आणि सुरी वापरूनही पिझ्झा खातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 डिसेंबर : पिझ्झा हे नाव ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटतं ना? मात्र तुम्ही पिझ्झा कसा खाता यावरून तुमचं व्यक्तिमत्त्व कळतं. हा दावा वर्तनात्मक मानसशास्त्राचे अभ्यासक करतात. तसं तर बहुतांश लोक पिझ्झा त्रिकोणात तोडून खाणं पसंत करतात. काही लोक याचा रोल बनवून खातात तर काही लोक चक्क काटा आणि सुरी वापरूनही पिझ्झा खातात. काही असो फ्रेश बेक्ड पिझ्झाच्या एका स्लाईसमोर बाकी सगळ्या गोष्टी निरर्थक वाटतात. पण ही स्लाईस खाण्याची पद्धतच बरंच काही सांगते. मग जाणून घ्या काय सांगतो पिझ्झा!

कसा-कसा खातात लोक पिझ्झा

गुडफेलाज पिझ्झाद्वारे कमिशनच्या एका संशोधनात सात वेगवेगळ्या प्रकारे पिझ्झा खाणाऱ्या लोकांबाबत सांगितलं गेलं. या संशोधनात  झालेले जवळपास अर्ध्याहून अधिक म्हणजे 55 टक्के लोक या गोष्टीशी सहमत आहेत, की तुम्ही ज्याप्रकारे पिझ्झा खाता त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत खूप काही कळतं. पिझ्झा पारंपरिक पद्धतीनं कापून खाणाऱ्या लोकांची संख्या 37 टक्के आहे. पूर्ण रोल करून खाणारे 16 टक्के आहेत तर स्लाईस अर्धा फोल्ड करून खाणारे 8 टक्के आहेत. 6 टक्के काटे सुरीनं खातात. आणि त्याचा क्रस्ट म्हणजेच कडा टाकून देतात. 4 टक्के लोक असे आहेत जे क्रस्ट कुरतडल्यानानंतर मधला भाग खाणं पसंत करतात. 2 टक्के लोक पिझ्झा खाण्याआधी त्याला उलटं करतात.

ऑल ऑर नथिंग

पूर्ण पिझ्झा खाणारे लोक किंवा काहीच न खाणारे आयुष्यात जाणून असतात की त्यांना काय पाहिजे. त्यांना स्वतःची स्पष्ट मतं असतात. ते दुसऱ्यांचा विचार करून अस्वस्थ होत नाहीत. त्यामुळं हेच चांगलं राहील, की कुठल्याही विषयवर त्यांचं मन बदलण्याचे प्रयत्न करू नका.

प्रिम अँड प्रॉपर

जे लोक चाकू आणि सुरीचा वापर करत पिझ्झा खातात आणि आपल्याला हवे तसे तुकडे करून ठेवतात ते या संशोधनानुसार खूप परंपरावादी असतात. असे लोक निष्पक्ष, प्रामाणिक आणि सच्चे असतात. ते चांगले लिसनर अर्थात श्रोतेही असतात. दोस्तांना ते योग्य सल्ला देतात. शिवाय अतिशय शिस्तबद्ध असतात.

द कन्फॉर्मर

आपल्यातील बहुतांश लोक पिझ्झा खाण्याची पारंपरिक पद्धत निवडतात. आपण याला त्रिकोणात कापतो आणि हातानं हरेक तुकडा तुकडा तोडत खातो. संशोधनानुसार, याचा अर्थ असा, आहे की तुम्ही सामाजिक गोष्टी लगेचच अनुसरणारे आहेत. असे लोक कुठल्याही परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यास तयार असतात. खाण्याचे शिष्टाचार हे लोक नीटच पाळतात. हे लोक खाताना पिझ्झा शेअर करण्यासह बोलत असतात. हे लोक आशावादीही असतात.

द रिव्हर्सर

जे लोक पिझ्झा खाताना पहिल्यांदा क्रस्ट आणि नंतर मधला भाग खातात ते आत्मविश्वासानं परिपूर्ण असतात. हे गोष्टींची खूप कमी चिंता करतात. क्वचितच कधी रागावतात. हे प्लॅन बनवून काम करण्यावर विश्वास ठेवतात.

इनसाईड आउट

जे लोक पिझ्झा मधून खातात आणि त्याचा क्रस्ट तसाच सोडून देतात ते काहीतरी अनोखं करून दाखवणारे आणि सहजसाधे असतात. यांच्यात उत्साह भरलेला असतो. त्यांचे निर्णय झटपट आणि भावनेच्या भरात घेतलेले असू शकतात. त्यांना स्वातंत्र्य प्रिय असतं. थरार मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते.

हेही वाचा केळीला का म्हटलं जातं Happy Food? जाणून घ्या केळीचा इतिहास, फायदे आणि बरंच काही

नीट फ्रीक

जे लोक पिझ्झाचा स्लाईड अर्ध्यात फोल्ड करून सँडविचसारखा खातात ते एकदम परफेक्शनिस्ट असतात. त्यांना आयुष्याचा अधिकाधिक उपयोग करायचा असतो. अनेकदा त्यांचा कृतीमागे काही हेतू नसतो. त्यांना कुठलीही घाई आवडत नाही. हे लोक आनंदी स्वभावाचे आणि स्वतःतच आनंदी राहणारे असतात.

हेही वाचा बड्डे आहे घोड्याचा! चेतकच्या मालकाची जंगी पार्टी; 22 किलोचा केक आणि मेजवानी

बॉटम्स अप

पिझ्झाचा आनंद घेण्याचा हा सगळ्यात अनोखा प्रकार आहे. पिझ्झाला उलटं करून खाल्लं जाणं यात होतं. असा पिझ्झा खाणारे लोक क्रिएटिव्ह असतात. शिवाय धाडसी असतात. ते फॉलोअर न बनता लीडर बनतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो. गोष्टी स्वतःला हव्या तशाच ते करतात. त्यांना दोस्तांची खूप काळजी असते. विशेषतः दोस्त संकटात असताना ते मदत करतात.

मात्र शेवटी काय, तुम्ही पिझ्झा खायला कुठलीही पद्धत निवाडा, त्याचा आनंद मात्र नक्की घ्या.

(Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 लोकमत त्याची हमी देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Food, Pizza, Research, Survey