केळीला का म्हटलं जातं Happy Food? जाणून घ्या केळीचा इतिहास, फायदे आणि बरंच काही...

केळीला का म्हटलं जातं Happy Food? जाणून घ्या केळीचा इतिहास, फायदे आणि बरंच काही...

327 इसवी सन पूर्व (BC) मध्ये केळी अरब लोकांच्या माध्यमातून पश्चिमेकडील देशांमध्ये पोचली होती.

  • Share this:

मुंबई, 7 मार्च : प्रवासात असताना, घरात काही अन्न तयार नसताना किंवा खेळताना अचानक पोटात कावळे ओरडू लागल्यावर सगळ्यात आधी कुठलं साधंसहज फळ हाताशी असेल तर ते म्हणजे केळी. (health tips)

तुम्हाला माहीत आहे का, की केळीला हॅपी फूडसुद्धा (happy food)  म्हणतात. केळी जगभरात खाल्ली जाते. आपल्या गुणांच्या संदर्भानंही केळी खूप चांगली आहे. केळी कुठल्याही मोसमात खाल्ली जाऊ शकते. (banana for health)

इतिहास  

केळीचा इतिहास तसा खूप जुना आहे. साऊथ ईस्ट एशिया, मुख्यतः भारतात केळीचा ओरिजिन असल्याचं मानलं जातं. 327 इसवी सन पूर्व (BC) मध्ये केळी अरब लोकांच्या माध्यमातून पश्चिमेकडील देशांमध्ये पोचली होती. केळीचा उल्लेख भारतीय परंपरेत तसा खूप जुना आहे. सर्व ग्रंथ आणि पुराणांमध्ये केळीचा उल्लेख आहे. आजही पूजेत केळीचं महत्त्व बरंच आहे. भारतात वेगवेगळ्या आकार आणि रंगात केळी मिळते. (history of banana)

महत्त्व

केळीचं सामाजिक महत्त्व खूप आहे. मंदिरात आणि विविध दक्षिण भारतीय घरांमध्ये थाळी म्हणून केळ्यांची पानं उपयोगात येतात. हिंदू धर्मात केळ्यांचं पण महत्त्वाचं आहे. प्रसाद म्हणूनही केळी वापरली जाते. (banana in India)

उपयोग

केळी विविध रूपात उपयोगात आणली जाते. कच्च्या केळ्यांची भाजी, कोफ्ते, चिप्स, लोणचं बनतं. अगदी केल्याच्या देठांची भाजीही मस्त बनते. केळं नुसतं खाल्लं जातं तसंच त्याची लस्सी, मिल्कशेक आणि आईस्क्रीम बनतं. फ्रूट कस्टर्डमध्येही केळी टाकतात. (benefits of banana)

व्यापार

भारत केळीचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. भारताच्या विविध भागात केळी जितकी पिकवली जाते तेवढीच पूर्ण जगात निर्यात करण्यासाठी उगवली जाते. भारतात केळीला मोठी मागणी आहे. केळी इन्स्टंट ऊर्जा देते. ती मुडपण चांगला करते. तिला हॅपी फूड म्हणतात. (qualities of banana)

हेही वाचा हद्दच झाली! कोरोनाचा उद्रेक होत असताना कपलचा 'कार'नामा! तब्बल 30 हजारांचा फटका

शेती

केळीचं सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होतं. मात्र केळीची सर्वाधिक शेतजमीन तामिळनाडूमध्ये आहे. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक येतो. दक्षिणेत गेल्यावर प्रत्येक दुकानात विविध रंग आणि आकाराच्या केळी दिसतात. आपल्या देशात जवळपास 20 प्रकारच्या केळी उगवल्या जातात.

हेही वाचा एवढ्याशा म्हशीनं भल्यामोठ्या हत्तीला शिंगावर धरलं आणि... काय घडलं पाहा VIDEO

फायदा

केळ्यात मुख्यतः पोटॅशियम आणि पेक्टिन असतं. सोबतच मानवी मनाला फील गुड वाटायला लावणारी तत्त्वही यात असतात. केळी शरीराची सूज कमी करते. नव्हर्स सिस्टम योग्य ठेवते. पांढऱ्या पेशी आणि ब 6 जीवनसत्व वाढवते.

Published by: News18 Desk
First published: March 7, 2021, 8:31 AM IST

ताज्या बातम्या