जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / टक्कल असलेल्यांना करावा लागतो या भेदभावांचा सामना, सर्व्हेमधून झाले काही खुलासे

टक्कल असलेल्यांना करावा लागतो या भेदभावांचा सामना, सर्व्हेमधून झाले काही खुलासे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

टक्कल असणं ही एक शारीरिक कमतरता म्हणता येईल. तिला विज्ञानाच्या भाषेत एलोपेशिया म्हणतात. हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. यात शरीराला रोगापासून वाचवणारी रोगप्रतिकारक क्षमताच केसांच्या फॉलिकल्सवर अटॅक करू लागते. आणि

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे : टक्कल असलेल्या लोकांना भेदभावाचा सामना करावा लागतो. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण एका सर्व्हेमधून यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.  समाज अशा लोकांकडे नक्की कसं पाहतो हे समजून घेण्यास हार्वर्ड विद्यापीठानं एक सर्वेक्षण केलं. 2 हजारांहून अधिक लोकांवर हा ऑनलाईन सर्व्हे केला गेला. या सर्व्हेमध्ये समोर आलं, की समाज टक्कल असलेल्या लोकांना घाणेरडं, कुरूप आणि असमंजस मानतो. 6 पैकी 1 व्यक्ती टक्कल असलेल्या माणसाशी बोलण्यास कचरतो. सर्व्हेचे आकडे सांगतात, 6.2% लोक टक्कल असलेल्या माणसाला नोकरी देण्यातही मागं-पुढं पाहतात. टक्कल असण्याची कारण काय आहेत? टक्कल असणं ही एक शारीरिक कमतरता आहे. तिला विज्ञानाच्या भाषेत एलोपेशिया म्हणतात. हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. यात शरीराला रोगापासून वाचवणारी रोगप्रतिकारक क्षमताच केसांच्या फॉलिकल्सवर अटॅक करू लागते. आणि व्यक्तीला टक्कल पडतं. एलोपेशियावर अजून काही उपचार नाहीत.

News18लोकमत
News18लोकमत

तज्ञ सांगतात, टक्कल पडण्याची अनेक कारणं असू शकतात. यात कौटुंबिक इतिहास, हार्मोन्समध्ये बदल, पोषक तत्वांची कमतरता, तणावात असणं अशी कारणं आहेत. याशिवाय जास्त रासायनिक शॅम्पू वापरणं आणि केसांना तेल न लावणं यामुळंसुद्धा टक्कल पडू शकतं. नेल कटरमध्ये का असतात 2 सुऱ्या? 99 टक्के लोकांना माहिती नाही याचा योग्य वापर सर्व्हेमध्ये लोक काय म्हणतात 30% लोक म्हणतात, की टक्कल असलेले लोक आजारी असू शकतात. 27% लोकांची समजूत आहे, की ते कुरूप असतात. 10% लोकांचं म्हणणं होतं, की ते कुठल्या तरी संसर्गाची बाधा झालेले आहेत. 4% लोक त्यांना असमंजस आणि 4% त्यांना घाणेरडे मानतात. ब्रिटनच्या मानसोपचारतज्ञ डॉ. केरी मॉन्टगोमेरी सांगतात, की एलोपेशियाचे रुग्ण आम्हाला अनेकदा हे सांगतात, की लोक त्यांच्यासोबत किती भेदभाव करतात. त्यांना टक लावून पाहतात. त्यांना नकोसे प्रश्न विचारतात. त्यांना न आवडणारी शेरेबाजी करतात. अंड्यापेक्षा जास्त हायप्रोटिन देतात 7 भाज्या, शाकाहारी लोकांसाठी पर्वणीच डॉ. कॅरी म्हणतात, ‘असे लोक मग समाजात मिसळण्यापासून दूर राहतात. सर्व्हे सांगतो, की टक्कल असलेल्या लोकांना कशा भेदभावाला सामोरं जावं लागतं, ते अगदी उघड आहे. लोकांमध्ये एक समज प्रचलित आहे, की टक्कल असलेले लोक आजारी असतात. मात्र हा एक मोठाच चुकीचा समज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात