आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स, ख्रिसमस स्पेशल VIDEO VIRAL

आजारातून बरं झाल्यानंतर रेमो डिसूझांचा पत्नीबरोबर खास डान्स, ख्रिसमस स्पेशल VIDEO VIRAL

रेमो डिसूझा (Remo D'Souza) यांच्या घरी दरवर्षीच ख्रिसमस (Christmas) धुमधडाक्यात साजरा केला जातो.. या वर्षीही रेमो कुटुंबाबरोबर आणि काही जवळच्या मित्रांबरोबर ख्रिसमसची साजरा करत आहेत.

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर: बॉलिवूड नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D'Souza) यांना काही दिवसांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.  हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांना दिवसांपूर्वी मुंबईच्या रुग्णायलात भरती करण्यात आलं होतं. आता रेमो त्याच्या घरी विश्रांती घेत आहे आणि कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. रेमो डिसूझा यांच्या घरी दरवर्षीच ख्रिसमस (Christmas) धुमधडाक्यात साजरा केला जातो.. या वर्षीही रेमो कुटुंबाबरोबर आणि काही जवळच्या मित्रांबरोबर ख्रिसमसची साजरा करत आहेत. डिसूझा कुटुंबाच्या पार्टीतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.  रेमोचा हा व्हिडीओ अभिनेता आमिर अलीने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत रेमो आणि आमिर अली (Aamir Ali)  आणि सँटा टॉय बरोबर थिरकताना दिसत  आहे.

View this post on Instagram

A post shared by Aamir Ali (@aamirali)

रेमो डिसूझा यांना हार्ट अटॅकमुळे (Heart Attack) आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसापूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रेमोच्या प्रकृतीनंतर त्याची पत्नी लीजलनेही त्याचा रुग्णालयातील एक व्हिडिओ शेअर केला होता. शिवाय ख्रिसमसची तयारी कशी करण्यात आली आहे याचा देखील एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमो डिसूझा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आणि मित्रांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, ' या वर्षीचा ख्रिसमस माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट ख्रिसमस आहे. माझे सर्व मित्र, कुटुंब आणि चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या पत्नी लीझलचे  विशेष आभार मानले आहे .

Published by: News18 Desk
First published: December 25, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading