Home /News /entertainment /

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; 'या' महिलेने केला मोठा खुलासा

महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; 'या' महिलेने केला मोठा खुलासा

या प्रकरणात अद्याप बिग बींकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही

    मुंबई, 25 डिसेंबर : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Facebook) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध कवित, संदेशाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉगवर ते ज्या प्रकारे सक्रिय असतात त्यानुसार कोणता तरुणही राहू शकत नाही. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनातही अमिताभ बच्चन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवतात. मात्र नुकतीच त्यांनी एक अशी कविता पोस्ट केली आहे. ज्यामुळे त्यांच्यावर चोरीला आरोप लावण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुकवर एक कविता लिहिली आहे. थोड़ा पानी रंज का उबालिये खूब सारा दूध खुशियों का थोड़ी पत्तियां ख्यालों की.. थोड़े गम को कूटकर बारीक, हंसी की चीनी मिला दीजिये.. उबलने दीजिये ख्वाबों को कुछ देर तक..! यह जिंदगी की चाय है जनाब.. इसे तसल्ली के कप में छानकर घूंट घूंट कर मजा लीजिये...!! अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या या कवितेवरुन आता वाद सुरू झाला आहे. टीशा अग्रवाल नावाच्या एका महिलेने हा दावा केला आहे की, ही त्यांची कविता आहे. त्यांनी बिग बी यांच्या फेसबुक पोस्टवरही कमेंट केली आहे. त्यांनी याच श्रेय मिळायला हवं, अशी मागणी केली आहे. टीशाने आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिलं आहे की, जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचं क्रेडिटही देत नाही..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख.. टीशा अग्रवाल यांनी ही कविता 24 एप्रिल 2020 मध्ये लिहिली होती. ही कविता त्यांनी फेसबुकवरही पोस्ट केली होती. टीशा एक कवियित्री आहेत आणि फेसबुकवर विविध कविता शेअर करतात. चहा या विषयाला धरुन त्यांनी अनेक फेसबुक पोस्ट केल्या आहेत. यावर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. याबाबत अमिताभ बच्चन यांनी काही प्रतिक्रिया दिल्यात बातमी अपडेट केली जाईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amitabh Bachchan

    पुढील बातम्या