भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूरने 24 नोव्हेंबर 2021 ला दिल्लीच्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला. 23 नोव्हेंबर 2017 ला भुवनेश्वर आणि नुपूर यांचं उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये लग्न झालं. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भुवी आणि नुपूर यांच्या आयुष्यात गोड परीचं आगमन झालं. आयपीएलच्या या मोसमातही भुवनेश्वर कुमार सनरायजर्स हैदराबादकडून खेळणार आहे. आयपीएल लिलावामध्ये भुवनेश्वर कुमारला हैदराबादने 4.20 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. भुवीने 142 आयपीएल सामन्यांमध्ये 132 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या मोसमात हैदराबाद त्यांचा पहिला सामना राजस्थानविरुद्ध खेळणार आहे. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर मंगळवारी ही मॅच होणार आहे.❤️ pic.twitter.com/0sPvQSXMC8
— Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) March 28, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.