Home /News /coronavirus-latest-news /

फुफ्फुस नव्हे तर 'या' अवयवावर हल्ला करणार नवा Corona variant; Corona 4th Wave आधी तज्ज्ञांनी केलं Alert

फुफ्फुस नव्हे तर 'या' अवयवावर हल्ला करणार नवा Corona variant; Corona 4th Wave आधी तज्ज्ञांनी केलं Alert

कोरोनाच्या चौथ्या लाटेस कारणीभूत ठरणाऱ्या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

मुंबई, 28 मार्च : दोन वर्षांपूर्वी आलेली कोरोना महासाथ (corona pandemic) आता संपली आहे, असं वाटू लागताच त्याचा नवीन व्हेरिएंट येतो आणि त्या व्हेरिएंटमुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागते. जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना संपला आहे असं वाटू लागताच पुन्हा नवा व्हेरिएंट आढळला असून, त्यामुळे चिंता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटमुळे (omicron variant) जगभरात रुग्णसंख्या वाढली आणि हाहाकार माजला होता. भारतातही कोरोनाची तिसरी लाट आली. परंतु, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात तिसरी लाट कमी घातक ठरली. अशातच आता कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला आहे. ज्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वर्तवला जातो आहे (Corona forth wave in India). त्यातही हा व्हेरिएंट फुफ्फुस नव्हे तर दुसऱ्याच अवयवावर जास्त हल्ला करणार आहे. आशिया आणि युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता, कोरोनाची चौथी लाट कधीही येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत तज्ज्ञ वेगवेगळे दावे करत आहेत. हा विषाणू फुफ्फुसाऐवजी (lungs) शरीराच्या इतर भागांसाठी, प्रामुख्याने पोटासाठी घातक ठरू शकतो, असं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेआधी त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत तज्ज्ञांनी अलर्ट केलं आहे.  हा ओमिक्रॉनचा सब-व्हेरिएंट असून, त्याचं नाव ओमिक्रॉन बीए. 2 असं आहे. हे वाचा - कोरोना महासाथीत Brain Fog चा धोका; काय आहे ही समस्या, यातून कसं बाहेर पडायचं? झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी दावा केला आहे, बीए.2 हा विषाणू फुफ्फुसाऐवजी पोटावर हल्ला करतो. या विषाणूची लागण झाल्यास ओटीपोटात दुखणं, मळमळ आणि जुलाब यांसारखी लक्षणं दिसतील. अशी लक्षणं दिसल्यास खबरदारी घ्यावी आणि तब्येत जास्त बिघडल्यास डॉक्टरांना भेटावं. आतड्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अतिसार आणि पोटदुखी ही सामान्य लक्षणं होती. त्यामुळे विषाणू आतड्यात पोहोचण्याची शक्यता असते. याशिवाय नव्या व्हॅरिएंटमुळे थकवा खूप जाणवतो. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका, कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टर्सकडे जा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. हे वाचा - आता कॉलआधी ऐकू येणार नाही कोरोना Caller Tune, पाहा काय आहे सरकारचा प्लॅन ओमिक्रॉनच्या बीए.2 व्हेरिएंटचा (BA.2) उगम कोठून झाला याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. सर्वात प्रथम तो ऑस्ट्रेलियामध्ये (Corona virus Australia) सापडल्याचं म्हटलं जातं, तर एका मतप्रवाहानुसार भारतात (Corona virus in India) तो सर्वात आधी सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. बीए.1 (BA.1) हा व्हेरिएंट सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेत (South Africa Corona) आढळून आला होता. सर्वात वेगानं पसरणारा हा व्हेरिएंट तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला असला, तरी सध्या जगभरात BA.2 मुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण जगातल्या सुमारे 50 देशांमध्ये याचा संसर्ग फैलावला असून, जगातल्या प्रत्येक 5 पैकी एकाला याचा संसर्ग होत आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या