Home /News /lifestyle /

आपला 'आजार' पाहून हादरली तरुणी, डॉक्टरविरोधातच केली तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

आपला 'आजार' पाहून हादरली तरुणी, डॉक्टरविरोधातच केली तक्रार; नेमकं काय आहे प्रकरण पाहा

आजार पाहून तरुणी संतप्तच झाली.

    मुंबई, 09 ऑक्टोबर : रुग्णासाठी डॉक्टर (Doctor) म्हणजे देवच असतो. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास तो डॉक्टरांवर ठेवतो. आपल्या नेमकं काय झालं आहे, याचं अचूक आणि योग्य निदान डॉक्टर करतात. असं काही वेळा होतं की डॉक्टर आपल्याला एखादा आजार झाल्याचं सांगतात आणि आपल्या पायाखालची जमीनच सरकते. आपल्याला डॉक्टरांवरही विश्वास बसत नाही. अशाच एका डॉक्टराने सांगितलेला आजार पाहून एक तरुणी इतकी संतप्त झाली की तिने थेट त्या डॉक्टरविरोधात तक्रार केली (Girl complained against doctor). स्पेनमधील (Spain) एक 19 वर्षांची तरुणी रिना सोफिया रुग्णालयात गेली. तिथं तिच्या काही तपासण्या करण्यात आला, त्यानंतर तिला डॉक्टरांनी तिच्या आजाराचा रिपोर्ट दिला. त्यात तिला होमोसेक्शुअल म्हणजे समलैंगिकता आजार असल्याचं लिहून दिलं (Spain doctor wrote homosexuality disease). म्हणजे आजाराच्या समोर समलैंगिक असं लिहिलं होतं. आपला हा आजार पाहून तरुणीसह तिच्या आईलाही धक्का बसला. हे वाचा - डॉक्टरच्या एका चुकीमुळे तरुणीचं आयुष्य उद्धवस्त; आधी धक्क्यानं आईचा मृत्यू, मग बॉयफ्रेंडनंही सोडली साथ तरुणीला सुरुवातीला ही मस्करी केल्यासारखं वाटलं. पण असं नव्हतं. शेवटी तिने आणि तिच्या आईने एलजीबीटी कलेक्टिव्ह गॅलेक्टीको (LGBTQ) च्या मदतीने मर्सियातील सरकार, आरोग्य मंत्रालय, आरोग्य सेवेच्या कार्यालयात तक्रार नोंदवली. डॉक्टर अद्यापही समलैंगिकतेला एक आजार म्हणून पाहतात. जे आता फक्त अवैध नाही तर मानवाधिकारांचं उल्लंघनही आहे, असा आरोप या तरुणीने केला आहे. रिपोर्टनुसार गॅलेक्टीकोने सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1990 सालीच समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून हटवलं आहे. तरी 31 वर्षांनीसुद्धा मर्सियाकील आरोग्य सेवेत काही डॉक्टर आहेत, जे सेक्शुअल ओरिएंटेशनकडे आजार म्हणून पाहतात. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे एलजीटीबीक्यू (LGBTQ) समुदायला दररोज भेदभाव, हिंसा आणि अपमानजनक व्यवहाराचा सामना करावा लागतो. हे वाचा - Shocking! Bum lift करताच तरुणीचा मृत्यू; नको त्या हौशेपोटी गमावला जीव या ग्रुपने डॉक्टर आणि रुग्णालयाने याबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे. तसंच मंत्रालयाला पत्र लिहून सर्व कर्मचाऱ्यांना समलैंगिकता, उभयलिंगी, ट्रान्ससेक्शुअलिटी आणि इंटरसेक्शुअलिटी याबाबत योग्य ती माहिती आणि संवेदनशीलतेसह प्रशिक्षित करण्याची मागणी केली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Serious diseases, Spain, World news

    पुढील बातम्या