लंडन, 5 जुलै : आपल्या आयुष्यात पैसे कमवणं, कुटुंबाबरोबर आनंदात जगणं आणि आपली तब्येत उत्तम राखणं ही ध्येय सामान्य माणूस ठेवतो. आरोग्य शारीरिकबरोबरच मानसिकही असतं. शारीरिक आरोग्यासाठी माणूस व्यायाम करतो. पण, मानसिक आरोग्यासाठी काही करण्याचे उपाय भारतीय समाजात फार प्रचलित दिसत नाहीत. पण आवडीच्या गोष्टी करणं आणि आहे त्यात समाधानी राहणं या शिकवणी सामान्य माणसाचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. पॉझिटिव्ह सायकॉलॉजी वैद्यकीय दृष्टिकोनातून म्हणाल तर सायको थेरेपी ही मानसिक आरोग्यावर उपचार करते त्यात संवाद (Conversation) आणि काउन्सिलिंग (Counseling) या दोन पद्धती प्रामुख्याने वापरल्या जातात. दुसरी पद्धत म्हणजे व्यक्तीच्या मनातील दु:ख कमी करण्याऐवजी त्याला सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला जातो आणि जो आनंदी आहे त्याला अधिक आनंदी करण्याचा प्रयत्न सायकॉलॉजीत केला जातो. यालाच पॉझिटिव्ह सायकॉलॉजी (positive psychology) म्हणतात. या सायकॉलॉजीत केवळ सायकॉलॉजिस्टच नाहीत तर सामाजिक कार्यकर्ते, लाईफ कोच आणि नव्या युगातले थेरेपिस्टही (social workers, life coaches and new age therapists) मदत करतात. पण एका नव्या संशोधनातून असा निष्कर्ष पुढे आला आहे की, माणसाला सकारात्मक विचार करायला लावण्यामध्ये नकारात्मकता, राग, पश्चात्ताप, चिंता या घटकांचीही महत्त्वाची भूमिका असते. रिपब्लिक वर्ल्ड डॉट कॉम या वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे. हे पॉझिटिव्ह सायकॉलॉजीस्ट नेहमी सल्ला देतात की जगण्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. त्यासाठी पश्चात्ताप, राग आणि चिंता (RAW emotions: regret, anger and worry) या भावना सोडण्याचा सल्ला देतात. म्हणजे भूतकाळातल्या घटनांचा पश्चात्ताप करू नका, सद्यस्थितीवर रागावू नका आणि भविष्यात काय होईल याची चिंता करत न बसता आहे त्या घडीचा आनंद लुटा. सांगायला किंवा वाचायला हे सोपं वाटेल. इतर प्राणी त्यांच्या इन्स्टिंक्ट आणि रिफ्लक्सेसच्या माध्यमातून जगू शकतात; पण माणसाच्या जगण्यात शिकणं आणि नियोजन करणं या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उदाहरण घ्यायचं तर शिकणं हे भूतकाळातल्या चुकांवर अवलंबून आहे. त्यामुळे भूतकाळातल्या चुका लक्षात ठेवणं आणि भविष्यात ते टाळणं हे माणूस करू शकतो. चिंतेबद्दल (Worry) म्हणायचं तर माणसाने उद्याची चिंताच सोडली तर तो चांगल्या जीवनमानासाठी आवश्यक शिक्षण, आरोग्य आणि अन्न साठवण्याची प्रक्रिया करणारच नाही. तसंच पश्चात्तापाचंही आहे. या आधीच्या अनेक संशोधनांत शास्रज्ञांनी सांगितलंय की राग ही भावना माणसाच्या मानसिक आरोग्याच्या (Mental health) दृष्टिने अत्यंत महत्त्वाची आहे. आपण रागवल्यामुळे आपला इतरांकडून गैरफायदा घेतला जात नाही. तसंच त्याच रागामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण होते आणि ते नीट वागतात तसंच आपलं म्हणणंही ऐकून घेतात. संशोधनात असं स्पष्ट झालं आहे की एखादं डील पार पाडायचं असेल तर त्याची बोलणी करताना आवश्यक तेवढं रागावण्याचं हत्यार (certain degree of anger) खूप उपयोगी पडतं आणि आपले हेतू साध्य करण्यास सहाय्यकच ठरतं. अजूनही वेळ गेली नाही! तुमच्या आहारातील ‘हे’ 5 पदार्थ किडनी आतून सडवतील ऑप्टिमिझम बायस काय असतो? या संशोधनातून असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे की नकारात्मकतेमुळे माणसाचा भोळेपणा आणि संशयी वृत्ती कमी होते. पाश्चिमात्य देशांतील जवळजवळ 80 टक्के जणांना ऑप्टिमिझम बायस (Optimism bias) असतो. माणूस चांगल्या आणि वाईट दोन्ही अनुभवांतून धडा घेत असतो. जी मंडळी सकारात्मक किंवा चांगल्या घटनांतून जास्त धडे घेतात ती ऑप्टिमिझम बायस्ड आहेत असं म्हटलं जातं. साधारणपणे वाईट अनुभवातून शिकल्याने पुढच्यावेळी ती चूक टाळणं शक्य होऊ शकतं. पण ही मंडळी चांगल्या अनुभवातून अधिक शिकतात. संशोधनात असं लक्षात आलं की ही मंडळी काही अविचारी निर्णय घेतात. याचं उदाहरण म्हणजे ही मंडळी ज्या प्रोजेक्टमधून खूप कमी नफा मिळण्याची शक्यता आहे अशा प्रोजेक्टमध्ये आपली सगळी गुंतवणूक करतात (all our funds into a project with little chance of success). हा ऑप्टिमिझम बायस अतिआत्मविश्वासाशी (overconfidence) निगडित आहे. सामान्यपणे अतिआत्मविश्वास असलेल्यांना वाटतं की आपल्यालाच सगळ्या विषयांतलं कळतं मग ते कार चालवणं असो की एखाद्या भाषेचं व्याकरण चालवणं (from driving to grammar). अतिआत्मविश्वास किंवा हेकेखोरपणा हा स्वभाव प्रचंड घातक असतो त्यामुळे चांगले संसारही उद्ध्वस्त होऊ शकतात, त्याऐवजी समोरच्याचं ऐकून त्याला थोडी मोकळीक दिली तर नाती उत्तम बहरू शकतात. एखाद्या अवघड कामाच्या तयारीवरही या अतिआत्मविश्वासामुळे वाईट परिणाम होतो, सतत दुसऱ्याच्या चुका पाहणं आणि त्याला दोष देण्यामुळे (blame others) त्या कामाचा, तयारीचा विचका होऊ शकतो. त्याउलट बचावात्मक नकारात्मक (Defensive pessimism) धोरण रागीट लोकांसाठी हिताचं ठरू शकतं. यात उगीच उच्च ध्येय ठेवून निश्चित करून ते अपूर्ण राहिल्याबद्दल त्रागा करण्याऐवजी साधं ध्येय ठेवून ते शांत डोक्याने साध्य केल्याने त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहू शकतं.
आंतरराष्ट्रीय दृष्किकोनावरही प्रभाव भांडवलशाही व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणांवरही पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे जगभरात एखाद्या देशाची समृद्धी मोजण्याची परिमाणं त्या देशाचा विकास आणि जीडीपी (Growth and Gross Domestic Product) आहेत. खरं तर तिथल्या नागरिकांची मनस्थिती आरोग्य ही समृद्धी मोजण्याची परिमाणं म्हणून स्वीकारायला हवीत. हॅपीनेस इंडेक्स रूढ पद्धतीत एखादी व्यक्ती आनंदी आहे की नाही एवढं विचारूनच ती आनंदी आहे की नाही हे ठरवलं जातं. संयुक्त राष्ट्रांच्या हॅपीनेस इंडेक्समध्येही (UN Happiness Index) अशाच पद्धतीने नागरिकांचा आनंद मोजला जात असल्याने हॅपीनेसच्या यादीत चकित करणारे परिणाम दिसतात. या हॅपीनेस इंडेक्ससाठी जे प्रश्न विचारले जातात त्यांचा संबंध आनंदाशी नसतो तर आयुष्य जगणं कठीण आहे हे मान्य करण्याची तयारी किंवा मी इतरांपेक्षा कसा उत्तम आहे हे सांगण्याचं कसब याच्याशी संबंधित हे प्रश्न असतात. Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त कॉर्पोरेशन्स आणि राजकारण्यांकडून या पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचा वापर या पॉझिटिव्ह सायकॉलॉजीत आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात कसं यशस्वी झालोत हे दाखवण्यावर भर दिला जातो. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एजर कॅबानास यांच्या हिप्पोक्रसीमध्ये (“Happycracy”, the author, Edgar Cabanas) त्यांनी म्हटलंय की समाजाच्या आयुष्याबद्दलच्या थोड्याश्या नाराजीपासून ते आर्थिक, सामाजिक कारणांमुळे सामान्य माणसाला येणाऱ्या वैद्यकीय नैराश्याची (clinical depression) जबाबदारी या सामान्य माणसांच्याच माथी मारण्यासाठी कॉर्पोरेशन्स आणि राजकारणी या पॉझिटिव्ह सायकॉलॉजीचा वापर करतात. जर आपलं आपल्या आनंदावर नियंत्रण असतं तर आपण बेरोजगारी, भेदभाव आणि गरिबीला आपल्या नैराश्यासाठी दोषी कसं ठरवलं असतं? सत्य हे आहे की आपला आपलं आपल्या आनंदावर नियंत्रण नाही आणि विपरित स्थिती, गरिबी, ताण आणि अपारदर्शकता या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनातील भावनांवर आणि आनंदावर परिणाम होतो. तुम्ही खूप मोठ्या मानसिक धक्क्यातून गेला असाल किंवा आर्थिक फटका सहन केला असेल तरच पॉझिटिव्ह भावनांवर लक्ष केंद्रित करून तुम्हाला फायदा होऊ शकतो. तरीही भांडवलशाही कंपन्यांनी हेतुपुरस्सर कट म्हणून पॉझिटिव्ह सायकॉलॉजीची (Positive Psychology) संकल्पना जगाच्या पचनी पाडली असं या लेखकाला वाटत नाही. पण, आपला आनंद आपल्या हातात नसतो आणि तो मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींना आनंद मिळण्यापेक्षा ते भलत्याच परिस्थितीत जाऊ शकतात एवढं लेखकाला वाटतं. अनेकदा एखादं ध्येय समोर ठेवून ते पूर्ण केल्यावर मी आनंदी होईन असं वाटणारी व्यक्ती अपयशी झाली की अपराधी भावनेने नैराश्यात जाते. मग तिला प्रश्न पडतो की खरंच आनंद आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची भावना आहे का? ती कायम कशी टिकेल? या प्रश्नांची उत्तरं अमेरिकी तत्त्ववेत्ता राल्फ वाल्डो इमर्सन याने 100 वर्षांपूर्वीच दिली आहेत. तो म्हणतो, ‘ आपल्या जगण्याचा उद्देश आनंदी राहणं हा नाही. दुसऱ्याच्या उपयोगी पडा, लोकांना तुमच्याबद्दल आदर वाटू दे, इतरांना करूणा दाखवा. हे सगळं अशासाठी करा ज्यामुळे तुम्ही चांगलं जगलात असंच सर्वांना आणि तुम्हाला वाटेल.’ शरीराच्या आरोग्यासाठी जसं ताटातील सगळे पदार्थ खाणं आवश्यक असतं तसंच माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी चांगल्या आणि वाईट दोन्ही भावनांचा उपयोग होतो हे सायकॉलॉजीतील नव्या संशोधनाने सिद्ध झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.