• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • लय भारी! फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार

लय भारी! फळं-भाज्या खाणाऱ्याला पैसे देणार; व्यायाम केला तर बोनसही मिळणार

फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.

फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.

खुद्द सरकारनेच ही अफलातून योजना आणली आहे कारण...

  • Share this:
ब्रिटन, 27 जुलै : खाण्यासाठी (Eating) तुम्हाला पैसे मोजावे लागतात पण यासाठीच तुम्हाला कुणी पैसे दिले तर... तुम्ही खाण्यावर तुटूनच पडाल नाही का? आता तुम्हाला खाऊन पैसे हवे असतील तर तुम्हाला फळं-भाज्या (Eat fruit and vegetables) खाव्या लागतील. त्यात तुम्ही व्यायाम केला तर तुम्हाला बोनसही मिळेल. खुद्द सरकारनेच ही अफलातून योजना आणली आहे (Britain weight loss plan). जगात बऱ्याच लोकांच्या शारीरिक समस्यांचं कारण लठ्ठपणा (Obesity) आहे. यामुळे लोकांमध्ये टाइप 2 डायबेटिस, कर्करोग आणि मानसिक आजारांसारख्या समस्या देखील वाढत आहेत. युरोपच्या पश्चिम भागामधील नागरिकांमध्ये लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. खासकरून वयस्कर नागरिकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे. रिपोर्ट्सनुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोठ्या संख्येने मुलांमध्ये ओबेसिटीचा (Obesity) त्रास सुरू होतो. लठ्ठपणामुळे ब्रिटनमधील लोकांचे आयुष्यमान कमी होत आहे.  खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसणं, शारीरिक निष्क्रियता (Physical Inactivity) हे लठ्ठपणाचं सर्वात मोठं कारण आहे.  या समस्येवर तोडगा काढण्याचे ब्रिटन (Britain) सरकारने ठरवले आहे. ते आता ब्रिटिश नागरिकांना फिट (Weight Loss) बनवणार आहेत. त्यासाठीची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. ब्रिटिश नागरिकांनी घरातून बाहेर पडून शारीरिक हालचाल (Physical Activity) करावी. यासाठी सरकार लोकांना बक्षीस, बोनस आणि पैसे देत आहेत. सरकार यासाठी पुढील वर्षांच्या सुरवातीला एक अ‍ॅप्लिकेशन (App to Tackle Obesity) देखील लाँच करणार आहे. हे वाचा - फुग्यासारखा कसा फुगतो फुलका? तुमच्या मनातल्या प्रश्नाचं सोपं उत्तर टेलिग्राफच्या वृत्तानुसार ब्रिटिश नागरिक सुपरमार्केटमधून कोणते पदार्थ, वस्तू खरेदी करतात यावर नजर ठेवली जाणार आहे. जे लोकं कॅलरी इनटेकचे (Calorie Intake) प्रमाण कमी करतील त्यांना बक्षीस दिलं जाईल. जे लोकं फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खरेदी करतील आणि अनहेल्दी फुड (Unhealthy Foods) कमी प्रमाणात खरेदी करतील त्यांना फ्री तिकीटंसुद्धा दिली जाणार आहेत. जे लोकं व्यायामासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या एव्हेंट्समध्ये भाग घेतील, शाळेमध्ये पायी चालत जातील. अशा लोकांसाठी सरकारद्वारे लाँच करण्यात येणाऱ्या ॲपमध्ये एक्स्ट्रा पॉइंट्स (Extra Points) जमा करण्यात येतील. यांचा वापर करून इन्सेंटिव्ह, फ्री तिकीट आणि डिस्काउंट्स मिळवता येणार आहेत. पंतप्रधान जॉन्सन यांनी आपण कोरोनामध्ये अधिक आजारी पडल्यामुळे वजन वाढल्याचं म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson) स्वत: या महिमेत सहभागी होत आहेत.   लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्वतः वजन कमी करण्याचा निश्चय केला आहे. हे वाचा - तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? ‘या’ पद्धताने ओळखा चहाची शुद्धता हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जगभरातील यशस्वी मोहिमांकडून प्रेरणा घेतली जाईल. सिंगापूरमधील स्टेप चॅलेंज यासाठी विशेष प्रसिद्ध झालं होतं. ब्रिटनमधील 700,000 ब्रिटिश नागरिकांसाठी फ्री फॅट फायटिंग क्लास (Free Fat Fighting Class) सुरू केले जातील. यासाठी सरकारने 100 दशलक्ष पौंडचे पॅकेजही जाहीर केलं आहे. ज्या ठिकाणी लठ्ठपणाच्या जास्त केसेस आहेत, अशा इंग्लंडच्या 11 भागांमध्ये जुलैमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली गेली.
First published: