दिल्ली,3 जून : डायरी लिहण्याची (Diary Writing) सवय (Habit) अनेकांना असते पण, महत्त्वाचा हा प्रश्न हा आहे की, आपले विचार, आठवणी (Memories), स्वप्न, चिंता, समस्या, आनंद हे कागदावर लिहून ठेवण्याची आवश्यकता का निर्माण होते? आपल्या भूतकाळात (Past) घडलेल्या घटना अशाप्रकारे सांभाळून ठेवणं, त्याचा रेकॉर्ड तयार करून ठेवणं (Keeping Record) आवश्यक आहे का? डायरी लिहिण्याच्या गोष्टीला आपण एक सवय म्हणून पाहू शकतो.
या माध्यमातून आपल्या आयुष्यातले काही क्षण कायमचे आपल्या जवळ राहतात. अनेक प्रसिद्ध राष्ट्रपती, लेखक यांना डायरी लिहायची सवय होती. एकोणिसाव्या शतकातील नाटककार ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) यांचं म्हणणं होतं की ते डायरीशिवाय कुठेच प्रवास करत नाहीत, प्रवासात वाचण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी रोमांचक लिखाणं असावं लागतं.
पण, आता काळ बदललेला आहे. आता लोक ब्लॉग लिहून सोशल मीडियावर आपल्या जीवनातल्या घटनांची माहिती देतात. मात्र, तरीदेखील अजूनही काही लोकांना डायरी लिहायला आवडतं. जे लोक आयुष्यात एकटे आहेत. त्यांच्यासाठी डायरी लिहिण्याची सवय म्हणजे, आपल्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीकडे व्यक्त करण्यासारखं आहे. डायरी लिहिल्यामुळे मन शांत होतं. डायरी लिहिण्याचे आणखीनही काही फायदे जाणून घेऊयता.
(World Bicycle Day 2021: सायकलिंग एक उत्तम व्यायाम; होतील 'हे' फायदे)
तणाव होईल दूर
आपली भावना कागदावर उतरवून काढण्यामुळे मनातील चिंता, समस्या, वेदना, दूर होण्यास मदत मिळते. कागदावर आपल्या मनातला आक्रोश निराशा, दुःख, व्यक्त करणाण्याने आपल्या मनातील भावनांची तीव्रता कमी होते आणि मन शांत झाल्यामुळे आपण योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. आपल्या मनात वाढलेल्या नकारात्मक भावना कमी होतात आणि त्यामुळे त्यांचा मनावरील हानिकारक प्रभाव कमी होतो. मनसशास्त्रज्ञ जेम्स पेनबेकर (Psychologist James Paynebaker)यांच्या मते, तणावपूर्ण घटनांबद्दल लिहिल्यामुळे त्यातून बाहेर पडायला मदत मिळते. तणावामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होतात.
(हुश्शार कावळा! मांजराची फजिती करून तिच्या तोंडचा घासही पळवला; पाहा VIDEO)
स्मरणशक्ती वाढते
जेव्हा डायरीमध्ये आपण आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना लिहून काढतो तेव्हा, त्या लक्षात ठेवण्यास देखील मदत होते. डायरी लिहिताना त्यावर तारीख, दिवस आणि वेळेचा उल्लेख केल्यामुळे त्या दिवसाचं भूतकाळातल्या एखाद्या घटनेशी जोडलेलं महत्वही लक्षात ठेवायला मदत होते, जेव्हा कधी मनाला वाटेल तेव्हा आपण त्या आठवणींना उजाळा मिळतो.
एकटेपणा जाणवत नाही
डायरीच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. यात काही अनुभव, त्याबद्दलची मतं आपण लिहून काढू शकतो. दैनंदिन घटना, विचार, भावना या देखील डायरीमध्ये लिहिता येतात. त्यामुळे आपोआपच मन शांत होतं. डायरी लिहिण्याने आपल्या मनातल्या भावना इतरांकडे व्यक्त करण्याची गरज पडत नाही. एखाद्या मित्राप्रमाणे आपण आपल्या डायरीशी बोलू शकतो.
(कोरोना विषाणू माणसाच्या लैंगिक जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो? ते पहा)
लिखाणाची सवय लागते
लिखाणाची सवय सुधारायची असेल तर, डायरी लिहिण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे आपल्याला लिखाणाची सवय लागू शकते. सुरुवातील विषय सुचायाल अडचणी येऊ शकतात. पण, लिखाणाची सुरुवात सोप्या पद्धतीने करता येते. सुरुवातीला दिवसभरात घडलेल्या घटना लिहायला सुरुवात करा. हळूहळू लेखनाची सवय लागेल आणि लिखाणात सुधारणाही होईल.
ध्येय निश्चिती
आपली महत्त्वाकांक्षा, इच्छा आणि संकल्प डायरीमध्ये लिहून ठेवण्याने ध्येयावर लक्ष केंद्रीत करता येतं. वर्षाच्या सुरुवातीला वर्षभराचं नियोजन करू शकतो. डायरीमध्ये संकल्प लिहून ठेवल्यामुळे स्वतःच्याच प्रगतीचं मूल्यमापन करता येतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle