हा विषाणू माणसाच्या लैंगिक जीवनावर कशा प्रकारे परिणाम करतो, याबाबत यंदाच्या मार्च महिन्यात संशोधनाचे निष्कर्ष स्पष्ट झाले होते. यानुसार, ज्या पुरुषांना कोरोनाचा संसर्ग होतो, ते पुरुष इरेक्टाईल डिस्फंक्शनची तक्रार करताना दिसून येत आहेत. या आजाराला भारतातील सर्वसाधारण बोली भाषेत नपुंसकता असं म्हणतात. या लोकांना सेक्स दरम्यान इरेक्शन होत नसल्याचं दिसून येतं.
संशोधन काय सांगतं नुकतेच इटलीमध्ये याबाबत संशोधन करण्यात आले. कोरोना विषाणू माणसांची कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीम उध्वस्त करुन टाकतो. कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमच्या माध्यमातून मानवी शरीरातील पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यामुळेच पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या निर्माण होत असल्याचे संशोधन सांगते
साथीचा सेक्स लाईफवर प्रतिकूल परिणाम जवळच्या व्यक्ती गमवणं आणि एकटेपणा यासारख्या समस्यांमुळे अनेकांना इरेक्टाइल डिस्फंक्शन चा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे 20 ते 30 वयोगटातील लोकांच्या सेक्स लाईफवर विपरित परिणाम झाला आहे. जे लोक विवाहित आहेत ते वर्क फ्रॉम होममुळे खूप दबावात आहेत. असं डॉक्टर सांगतात.