मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पर्यटकांना दिसलं असं विचित्र काळवीट; त्याच्या शिंगांमध्ये नेमकं काय आहे तुम्ही सांगू शकाल का?

पर्यटकांना दिसलं असं विचित्र काळवीट; त्याच्या शिंगांमध्ये नेमकं काय आहे तुम्ही सांगू शकाल का?

विचित्र शिंग असलेल्या या काळविटाचा (antelope) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विचित्र शिंग असलेल्या या काळविटाचा (antelope) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विचित्र शिंग असलेल्या या काळविटाचा (antelope) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गॅबोरॉन, 29 मार्च : जंगल सफारी करताना किंवा नॅशनल पार्कमध्ये आपण प्रत्यक्षात असे अनेक प्राणी पाहतो ज्यांची फक्त नावं आपल्याला माहिती आहेत. त्यांना आपण फोटोत आणि व्हिडीओतच पाहिलेलं असतं. शिवाय या प्राण्यांमध्येही आपला वैविध्य दिसतं. त्यावेळी असंही असतं का असा प्रश्न आपल्याला पडतो. सध्या अशाच एका प्राण्याची चर्चा आहे हा प्राणी म्हणजे काळवीट (antelope). दक्षिण आफ्रिकेतील बोट्सवाना देशात असं काळवीट आढळलं आहे जे थोडं विचित्र आहे.

बोट्सवानातल्या सेंट्रल कलाहारी गेम रिझर्व्हमध्ये असं काळवीट दिसलं ज्याच्या दोन शिंगांमध्ये काहीतरी होतं. अनेक पर्यटकांनी या काळविटाला पाहिलं. प्रत्येकाला ते पाहून धक्काच बसला. या काळविटाच्या शिंगात नेमकं आहे तरी काय याबाबत पर्यटकांनी विविध तर्कवितर्क लढवले. काहींनी हे असं वेगळं काळवीट असावं असं म्हटलं तर  काही जणांनी या काळविटाच्या शिंगांमध्ये प्लॅस्टिक तर अडकलं नाही ना, अशी चिंताही व्यक्त केली.

हे वाचा - टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video

WildCRU कंपनीत काम करणारी जेस इस्डनने जेव्हा या काळविटाला लांबून पाहिलं तेव्हा तिलाही थोडं आश्चर्यच वाटलं. पण जेव्हा तिने या काळविटाला जवळून पाहिलं तेव्हा तिला उलट जास्त धक्का बसला. कारण या काळविटाच्या शिंगामध्ये नेमकं काय आहे ते तिला समजलं. या काळविटाची शिंग अशी नैसर्गिकरित्या नव्हती, त्याच्या शिंगांमध्ये कोणता दुसरा असा भाग नव्हता किंवा ते प्लॅस्टिकही नव्हतं तर चक्क होतं कोळ्याचं जाळं.

कोळ्यांचं जाळं या काळविटाच्या फक्त शिंगांवरच नाही तर त्यच्या चेहऱ्यावर आणि नाकावरही होतं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार ती म्हणाली, त्या काळविटाच्या शिंगात कोळ्याचं जाळं होते आणि हे खूप विचित्र होतं. आमच्या ग्रुपमध्ये बोट्सवानात 30 वर्षांपासून राहणारी एक व्यक्ती होती. तिनंसुद्धा याआधी असं काहीच पाहिलं नसल्याचं सांगितलं. त्याच्या शरीरावर खूप कोळीही फिरत होते.

हे वाचा - क्युट पांडा; हुबेहुब माणसासारखं खातो गाजर, VIDEO पाहून म्हणाल कमाल आहे!

डेली मेलच्या रिपोर्टनुसार जेसने हा फोटो गेल्यावर्षी घेतला होता पण  हे कोळ्याचं जाळं नेमकं आलं कुठून, कसं, नेमकं काय झालं याची तिला माहिती हवी आहे म्हणून तिनं आता सोशल मीडियावर अपलोड केला. काही काळविटांमध्ये असं असावं, असं काही लोकांनी सांगितलं. पण आम्हाला असा दुसरा कोणताच काळवीट तिथं दिसला नाही, असं जेस म्हणाली. शिवाय काही जणांनी ते काळवीट ओलं असावं म्हणून त्याच्याभोवती भरपूर कोळी असावेत अशी शक्यताही व्यक्त केली. पण हे काळवीट दुष्काळाच्या वेळी दिसून आलं होतं, असंही तिनं सांगितलं.

First published:

Tags: Viral, Wild animal