Home /News /lifestyle /

OMG! टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video

OMG! टॉयलेटवर सीटवर बसताच खालून आला अजगर आणि...; पुढे काय घडलं पाहा Shocking Video

टॉयलेट सीटवर बसताच खाली काहीतरी टोचत आहे म्हणून त्याने वाकून पाहिलं तर धक्काच बसला.

    बँकॉक, 29 मार्च : बाथरूमला झाली म्हणून तो घाईघाईत टॉयलेटमध्ये (Toilet) गेला. टॉयलेट सीटवर बसणार इतक्यात खालून काहीतरी टोचत आहे, असं त्याला जाणवलं तो टॉयलेट सीटवरून उठून उभा राहिला आणि त्याने टॉयलेटमध्ये डोकावून पाहिलं. तर त्याला धक्काच बसला टॉयलेटमध्ये दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक भलामोठा अजगर (python in toilet) होता. अजगराने टॉयलेटमधून आपलं डोकं बाहेर काढलं होतं. थायलंडमधील 45 वर्षांचा सोमाचाईच्या घरातील टॉयलेटमध्ये चक्क साप होता. समुत प्रॅकन प्रांतात राहणारा सोमाचाईच्या घरात  28 मार्चला अजगर सापडला.  तो टॉयलेट सीटवर बसला. खालून काहीतरी बम्पवर लागतं आहे, असं त्याला जाणवलं. तो टॉयलेट सीटवररून उठला आणि त्याने टॉयलेटमध्ये डोकावून पाहिलं. तर तिथं साप असल्याचं त्याला समजलं. साहजिकच अजगराला पाहिल्यानंतर जी अवस्था व्हाययला हवी ती सोमाचाईचीसुद्धा झाली. अजगराला पाहताच तो खूप घाबरला. त्याला घाम फुटला, हृदयाची धडधड वाढली, हातपाय कापू लागले. तशाच अवस्थेत त्याने पटकन डिटर्जंट हातात घेतलं आणि त्या अजगरावर फेकलं. पण अजगर काही तिथून हटेना शेवची सोमचाईने पळत जात आपात्कालीन सेवेला फोन केला. हे वाचा - म्हावरा पकडायला गेला आणि जाळ्यात गावलं भलतंच... पाहून तुम्हालाही फुटेल घाम डेली मेलच्या रिपोर्टनुसार सोमाचाईने सांगितलं, त्याने सकाळी घराबाहेर सापाला पाहिलं होतं. त्याने त्याला पकडण्याचाह प्रयत्न केला पण तो तिथून गायब झाला. हा तोच अजगर असावा अशी मला खात्री आहे.  मी टॉयलेट सीटवर बसलं तेव्हा मला खालून कुणीतरी ढकलत आहे असं वाटलं. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा तिथं साप होता. हे वाचा - न्हाव्यानंतर आता थेट डेंटिस्टलाही धमकी; त्या CUTE मुलाचा नवा VIDEO पाहिलात का? अथक प्रयत्नानंतर या सापाला पकडण्यात आलं आहे. अजगराला पकडतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. त्याला एका सुरक्षित बॅगेत ठेवण्यात आलं आणि त्याच्या आवश्यक त्या तपासण्या करून  गावापासून दूर जंगलात सोडून दिलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Python, Shocking viral video, Snake video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या