Home /News /lifestyle /

Chanakya Niti: लोकांना प्रमाणापेक्षा जास्त बदलण्याची चूक करू नका; वाढतील शत्रू

Chanakya Niti: लोकांना प्रमाणापेक्षा जास्त बदलण्याची चूक करू नका; वाढतील शत्रू

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतीनुसार (Niti) चुकूनही लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका.

    दिल्ली,20 जून : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. आचार्य चाणक्य सांगतात एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त बदल करण्याचा प्रयत्न केला तर तो आपला शत्रू बनण्याची शक्यता असते. (Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत) प्रत्येत व्यक्तीला आपण अगदी योग्य आहोत असा समज असतो. त्यामुळेच कोणत्याही व्यक्तीला त्याच्यामधील दुर्गुणांची जास्त प्रमाणात जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याकडे लक्ष देत नाहीत. कारण कुणालाच स्वतःमधल्या कमतरता दिसत नाहीत. प्रत्येकालाच वाटतं की आपण परफेक्ट आहोत अस वाटतं. त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती मधल्या कमतरता सांगायला लागतो तेव्हा, ते त्यांना ते आवडत नाही. (Chanakya Niti: ‘या’ 5 गोष्टी आहेत आर्थिक संकटाचे संकेत) त्यामुळेच एखाद्या व्यक्तीला त्याच्यामधल्या कमतरता यांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती आपल्यापासून दूर जायला लागते. त्यामुळेच आयुष्यात कधीच अशी चूक करू नये. कारण हळूहळू त्या व्यक्तीला आपल्याबद्दल घृणा वाटायला लागते. म्हणूनच इतरांच्या चुका किंवा कमतरता दाखवणारे लोक आपल्यासाठी शत्रू वाढवत असतात. म्हणूनच आचार्य चाणक्य म्हणतात जेव्हा आपण दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण आपल्यासाठी शत्रू वाढवत असतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Acharya chanakya, Chanakya niti

    पुढील बातम्या